Join us
Daily Top 2Weekly Top 5

जॅकलिन चुलबूल पांडेच्या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2016 11:26 IST

झलक दिखला जा या कार्यक्रमात या आठवड्यात प्रेक्षकांना एक वेगळी थिम पाहायला मिळणार आहे. या आठवड्यात महिला स्पर्धक पुरुषांच्या ...

झलक दिखला जा या कार्यक्रमात या आठवड्यात प्रेक्षकांना एक वेगळी थिम पाहायला मिळणार आहे. या आठवड्यात महिला स्पर्धक पुरुषांच्या वेशात तर पुरुष स्पर्धक महिलांच्या वेशात नाचणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना त्यांचे लाडके कलाकार एका वेगळ्या रूपात पाहायला मिळणार आहेत. या थिमनुसार शंतनू महेश्वरीने मुन्नी बदनाम हुई या गाण्यावर नृत्य सादर केले. या नृत्याला सगळ्यांचीच वाहवा मिळाली. त्याला या गाण्यावर नृत्य करताना पाहून जॅकलिननेही दबंगच्या एका गाण्यावर नृत्य सादर केले. दबंग या चित्रपटाच्या हुड हुड दबंग या गाण्यावर सलमानच्या अंदाजात ती थिरकली. एवढेच नव्हे तर तिने सलमानसारखा गॉगलही लावला होता. जॅकलिनचा हा अंदाच प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी तिला खात्री आहे.