शशांकचे हे रूप पाहून धक्का बसेल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2016 16:03 IST
होणार सून मी या घरची.. या लोकप्रिय मालिकेतून घराघरांत पोहोचलेला श्री म्हणजेच शशांक केतकर याने स्वत:चे एक मजेशीर क्लिक ...
शशांकचे हे रूप पाहून धक्का बसेल
होणार सून मी या घरची.. या लोकप्रिय मालिकेतून घराघरांत पोहोचलेला श्री म्हणजेच शशांक केतकर याने स्वत:चे एक मजेशीर क्लिक सोशल मिडीयावर शेअर केले आहे. सुरूवातीला अनेकांना शशांकचे हे रूप पाहून धक्का बसला. मात्र, छायाचित्राबरोबरचा संदेश पाहून या सगळ्याचा उलगडा झाला. मला माहिती आहे की, हे विचित्र आहे. पण, मेकअप रूममध्ये तुमच्या हाती अशा प्रकारचा केसांचा विग लागल्यानंतर असे घडते, असे शशांकने त्याच्या सोशलमिडीयावर सांगितले आहे. नुकतेच शाशांक हा आॅस्ट्रेलियाचा फुल एन्जॉयमेंट दौरा करून परतला आहे. तसेच त्यान आॅस्ट्रेलियाचे विविध ठिकाणचे फोटोदेखील सोशलमिडीयवर शेअर केले आहेत. आता तो, वन वे तिकीट या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी असल्याचे दिसत आहे.