Join us
Daily Top 2Weekly Top 5

​‘यह उन दिनों की बात है’ या मालिकेत गुड्डी मारुती साकारणार ही भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2018 11:54 IST

टेलिव्हिजन आणि चित्रपटातील प्रसिद्ध कलाकार गुड्डी मारुतीने आजवर भारतीय प्रेक्षकांना खळखळून हसवले आहे. ती आता सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील यह ...

टेलिव्हिजन आणि चित्रपटातील प्रसिद्ध कलाकार गुड्डी मारुतीने आजवर भारतीय प्रेक्षकांना खळखळून हसवले आहे. ती आता सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील यह उन दिनों की बात है या मालिकेत दिसणार आहे. ही मालिका प्रेक्षकांना नव्वदच्या दशकाच्या मधुर आठवणी करून देत आहे. या मालिकेत याच काळातील समीर (रणदीप राय) आणि नैना (आशी सिंह) यांची प्रेम कहाणी प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. या मालिकेत आता त्या काळातील कॉलेज जीवन दाखवण्यात येणार असून गुड्डी मारुती कॉलेजच्या मुख्याध्यापकाच्या भूमिकेत दिसणार आहे. याबाबत गुड्डी मारुतीला विचारले असता तिने सांगितले, “या प्रॉडक्शन हाऊसने मला या भूमिकेसाठी विचारले तो एक रोमांचक क्षण होता. मी आजवर अनेक चित्रपट आणि भारतीय टेलिव्हिजन मालिकांमधून काम केलेले आहे. पण ही एक वेगळीच मालिका आहे. मी कॉलेजच्या डीनची/मुख्याध्यापकाची भूमिका साकारते आहे आणि ती कडक शिस्तीची आहे. पण काही असे प्रसंग येतील, ज्यावेळी तिची मृदू बाजू प्रेक्षकांना दिसेल. माझ्या व्यक्तिरेखेचा लुक अगदी साधा आहे. मालिका सुरू झाल्यापासून या मालिकेला प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळत आहे. या मालिकेचा भाग होताना मला खूप आनंद होत आहे.”प्रेक्षकांना ‘यह उन दिनों की बात है’ या मालिकेचे पुढील भाग नक्कीच आवडतील अशी मालिकेच्या टीमला खात्री आहे. या मालिकेत आता समीर आणि नैना यांचा लूक देखील पूर्णपणे वेगळा असणार आहे. गुड्डी मारुती अनेक वर्षांपासून चित्रपटात काम करत आहे. चित्रपटांत काम केल्यानंतर गुड्डी छोट्या पडद्याकडे वळली. सध्या ती अनेक मालिकांमध्ये झळकत आहे. वीरा, कुछ रंग प्यार के ऐसे भी यांसारख्या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्यानंतर गुड्डीने सब वाहिनीच्या एका मालिकेत काम केले होते. या मालिकेत आजीच्या मुख्य भूमिकेत झळकली होती. या मालिकेतील गुड्डीची भूमिका अतिशय रंजक होती. या मालिकेत गुड्डीसोबतच नलिन नेगी, शिवानी वर्मा आणि रितू वशिष्ठ यांच्याही प्रमुख भूमिका होत्या. Also Read : यह उन दिनो की बात है या मालिकेतील आशी सिंग जपून ठेवणार मालिकेच्या या आठवणी