Join us

'दोन सेकंद धस्स झालं काळजात...'; विशाखा सुभेदारला लता दीदींकडून मिळाली अनोखी भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2021 19:05 IST

अभिनेत्री विशाखा सुभेदार यांची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत आली आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय विनोदी शो महाराष्ट्राची हास्यजत्रामधील दोन विनोदवीर चर्चेत आले आहेत. हे विनोदवीर म्हणजे अभिनेत्री विशाखा सुभेदार आणि अभिनेता समीर चौघुले. ते चर्चेत येण्यामागचं कारणदेखील तसं खासच आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्याकडून त्या दोघांना अनोखी भेटवस्तू मिळाली आहे. लता दीदी हास्यजत्रा हा शो पाहतात आणि त्यांना त्यातील कलाकारांचे काम आवडले म्हणून त्यांना भेटवस्तू पाठवली आहे. लतादीदींकडून भेटवस्तू मिळाल्यामुळे विशाखा सुभेदार आणि समीर चौघुले भारावून गेले आहेत. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून आपली भावना व्यक्त केली आहे. विशाखाची ही पोस्ट चर्चेत आली आहे. 

विशाखा सुभेदारने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर लिहिले की,  काय बोलू... शब्द हरवले आणि डोळे वाहू लागले... घरी एक पार्सल आलं आणि त्यावर एककार्ड होतं आणि चमचमत्या कागदात गुंडाळून एक "क्षण" आला, जो "सुख "आणि "आनंद "घेऊनच आला ...! त्यावरचं नाव वाचलं. आणि दोन सेकंद धस्स झालं काळजात.. लता मंगेशकर...!

तिने पुढे म्हटले की, त्या कायम हास्यजत्रा पाहतात, आणि त्यांना आमचं काम आवडत म्हणून त्यांनी आशीर्वाद रुपी भेट पाठवली. त्यांनी केलेले हे कामाचं कौतुक आणि आवर्जून पाठवलेली भेट. मी ठार झालेय खरंतर... देवा अजून काय हवयं...!  ह्यासाठी मी कायम महाराष्ट्राची हास्यजत्राची आभारी असेन. आणि ज्यांनी आम्हाला घडवलं ते सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे आणि सोनी मराठीचे देखील आभार... अमित फाळके, अजय भालवणकर, आणि आमची संपूर्ण जत्रेची टीम आणि ह्या यशात तुझ्या म्हणजेच सम्या उर्फ समीर चौघुलेशिवाय काहीही शक्य नव्हतं..थँक्य यू.

टॅग्स :लता मंगेशकर