एकेकाळी मोना सिंग हे टीव्हीवरील एक सुप्रसिद्ध नाव होते. अभिनेत्रीने २००३ मध्ये 'जस्सी जैसी कोई नहीं' या मालिकेतून छोट्या पडद्यावर आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि ती सुरुवात दमदार होती. 'जस्सी जैसी कोई नहीं' रातोरात हिट झाली आणि मोना सिंग स्टार बनली. दशकाहून अधिक काळ चाललेल्या करिअरमध्ये मोनाने 'क्या हुआ तेरा वादा', 'कवच्छ', 'प्यार को हो जाने दो', 'मौका ए वारदात' यांसारख्या मालिकांमध्ये काम करून प्रेक्षकांमध्ये तिची अमिट ओळख निर्माण केली. मुख्य भूमिका साकारण्यासोबतच तिने रिअॅलिटी शो होस्ट करूनही आपले टॅलेंट सिद्ध केले. जवळपास दोन दशके चित्रपटसृष्टीचा भाग असलेल्या मोना सिंगने आता छोट्या पडद्याला पूर्णपणे रामराम ठोकला आहे.
अभिनेत्री मोना सिंग सध्या चित्रपट आणि ओटीटीवर दिसत आहे. आर्यन खानच्या पदार्पणाच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड' या मालिकेत ती शेवटची दिसली होती. यापूर्वी मोना सिंगने अनेक चित्रपटांमध्येही काम केले आहे. 'लाल सिंग चड्ढा' सिनेमात तिने आमिर खानच्या आईची भूमिका साकारून खूप प्रशंसा मिळवली होती.
टीव्ही सोडण्याच्या निर्णयाबद्दल मोना म्हणाली...नुकतीच 'थोडे दूर थोडे पास' या वेबसीरिजमध्ये दिसलेल्या मोना सिंगने टीव्ही इंडस्ट्री सोडण्याबद्दल मौन सोडले आणि सांगितले की, ''हा निर्णय कठीण होता, पण आता टीव्ही जगातात तिच्यासाठी काही शिल्लक राहिलेले नाही. तिने जवळपास सर्वकाही केले आहे.'' यासोबतच मोनाने टीव्ही मालिकांमध्ये दिसणाऱ्या कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही चिंता व्यक्त केली.
मोना सिंगची ही आहे इच्छाआता मोना सिंगला ओटीटीवर लक्ष केंद्रित करायचे आहे. बॉम्बे टाईम्सशी बोलताना तिने सांगितले की, ''आता ओटीटी हाच त्यांच्यासाठी सर्वात योग्य पर्याय आहे. ती म्हणाली की, एका वेब शोवर तीन महिने काम करणे एकदम परफेक्ट आहे. तुम्हाला ब्रेक मिळतो, तुम्ही फ्रेश होऊन परत येता आणि नवीन भूमिकेत मिसळण्यासाठी तयार असता. ओटीटी माझ्यासाठी सर्वोत्तम आहे. नाहीतर, टीव्हीमध्ये कामाची 'टाइमलाइन' खूप वेडी असते, खासकरून जेव्हा तुम्ही मुख्य भूमिका करत असता. जेव्हा मी टीव्हीमध्ये काम करत होते, तेव्हा मालिका सोमवार ते गुरुवारपर्यंत प्रसारित होत होत्या, पण आता त्या संपूर्ण आठवडाभर चालतात. बापरे! या लोकांना कोणते वैयक्तिक आयुष्य आहे की नाही, याचे मला आश्चर्य वाटते.''
मालिकाविश्वाला अभिनेत्रीने केला अलविदाछोट्या पडद्याला रामराम ठोकण्याच्या तिच्या निर्णयाबद्दल मोना सिंग पुढे म्हणाली की, ''मी मालिकाविश्वाला पूर्ण आदराने अलविदा केले आहे. माझ्यासाठी आता तिथे करण्यासारखे फार काही उरलेले नाही. मला वाटते की मी सर्वकाही केले आहे. मालिका, रिअॅलिटी शो आणि होस्टिंग. हे पुढे जाण्यासाठी विचारपूर्वक घेतलेले पाऊल होते. हा बदल सोपा नव्हता, पण मी हे पाऊल उचलले.''
आगामी प्रोजेक्टचित्रपटांच्या ऑफर्स येण्यासाठी तिला वेळ लागला आणि तिने आरामात, समाधानाने बसून तिच्या ऑफर्सची वाट पाहिली, असे ती सांगते. नंतर तिला चित्रपट आणि ओटीटीच्या ऑफर्स मिळू लागल्या. याबद्दल ती सांगते की, ''यासाठी वेळ लागला, पण ही प्रतीक्षा योग्य ठरली. मला हव्या असलेल्या भूमिका मिळाल्या. मी चित्रपटही करत आहे. पुढील वर्षी माझे तीन चित्रपट येत आहेत आणि मी चित्रपट तसेच ओटीटीमध्ये समतोल साधून आनंदी आहे.''
Web Summary : Monna Singh, famed for 'Jassi Jaisi Koi Nahi,' transitioned from TV to OTT. Feeling creatively fulfilled, she sought better work-life balance, finding TV's schedule too demanding. Now, she focuses on films and web series, finding the work pace ideal.
Web Summary : मोना सिंह, 'जस्सी जैसी कोई नहीं' से मशहूर, टीवी से ओटीटी पर आईं। रचनात्मक रूप से संतुष्ट महसूस करते हुए, उन्होंने बेहतर कार्य-जीवन संतुलन की तलाश की, और टीवी का शेड्यूल बहुत डिमांडिंग पाया। अब, वह फिल्मों और वेब सीरीज पर ध्यान केंद्रित कर रही हैं, और काम की गति को आदर्श मानती हैं।