Join us
Daily Top 2Weekly Top 5

बिग बॉसच्या घरात असा साजरा झाला महाराष्ट्र दिन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2018 12:11 IST

मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा ! १ मे म्हणजे महाराष्ट्र दिन ...

मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा ! १ मे म्हणजे महाराष्ट्र दिन ... आपल्या सगळ्यांसाठीच महत्वाचा दिवस... बिग बॉसच्या घरामधील सदस्य आज महराष्ट्र दिन साजरा करताना दिसणार आहेत. घरातील सगळेच मंडळी अत्यंत सुंदर प्रकारे मराठमोळ्या पोशाखात तयार होणार आहेत. घरातील काही बायकांनी म्हणजेच रेशम, मेघा, स्मिता, जुई, नववारी नेसल्या असून पुरुषांनी फेटा, झब्बा असा पोशाख परिधान केला आहे. हे सगळेच रहिवाशी मोठ्या उल्हासात – जल्लोषात हा दिन साजरा करणार आहेत असे दिसून येत आहे. या रहिवाश्यां बरोबर आपले काही आवडते कलाकार आणि घरामधून एलीमनेट झालेले सदस्य देखील घरामध्ये हा दिवस साजरा करण्यासाठी जाणार आहेत.  कलर्स मराठीवरील प्रेक्षकांचा आवडता कार्यक्रम “सूर नवा ध्यास नवा” मधील प्रेसेनजीत कोसंबी घरामध्ये जाणार आहे. प्रेसेनजीत त्याच्या खड्या आणि गगनभेदी आवाजामुळे प्रेक्षकांचा लाडका बनला. बिग बॉस मराठी या कार्यक्रमामध्ये देखील महाराष्ट्र दिना निमित्त तो जय जय महाराष्ट्र माझा हे गाण म्हणणार आहे. त्याच्या या उत्तम गाण्यानंतर आस्ताद काळे देखील त्याच्यासोबत जयस्तुते हे गाण गाणार आहे, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे कि, आस्ताद काळे हा एक उत्तम गायक आहे, आणि तो बऱ्याचदा बिग बॉसच्या घरामध्ये गाणे गाताना दिसतो.याचबरोबर घरामधील सदस्य रेशम टिपणीस आणि स्मिता गोंदकर मिळून “पिंगा ग पोरी पिंगा” या गाण्यावर अप्रतिम नृत्य सादर करणार आहेत. रेशम आणि स्मिता दोघीसुध्दा नववारी मध्ये अत्यंत सुंदर दिसत आहे असे म्हणायला हरकत नाही. वायकॉम१८ मोशन पिक्चर्सचा “सायकल” हा सिनेमा ४ मे रोजी प्रदर्शित होणार असून त्यातील प्रियदर्शन जाधव हा घरातील रहिवाश्यांच्या भेटील येणार आहे आणि त्यांच्या सोबत बरीच धम्माल मस्ती करणार आहे. प्रियदर्शन सिनेमामध्ये चोराच्या भूमिका मध्ये दिसणार असून तो घरामध्ये देखील चोर बनूनच दाखल होणार आहे. घरामध्ये येताच तो घरातील रहिवाश्यांना काही आगळ्यावेगळ्या भेटवस्तू देणार आहे.घरातील सदस्यांनी देखील प्रियदर्शनचे स्वागत मोठ्या उल्हासात केले. भूषण कडू याने संजय नार्वेकर याची अक्टिंग करून देखील आणि सदस्यांचे मन जिंकले. घरामध्ये या कलाकारांबरोबरच नुकतेच बिग बॉसच्या घरामधून बाहेर पडलेले आरती सोलंकी आणि विनीत भोंडे यांनी देखील हजेरी लावली.