Join us

मुळ रूपात यायला दीड महिने लागले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2016 14:09 IST

नताशा स्टॅनकोव्हिक बिग बॉसच्या आठव्या पर्वात झळकली होती. शेवटच्या पाच स्पर्धकांपर्यंत या कार्यक्रमात ती टिकली होती. या कार्यक्रमातून बाहेर ...

नताशा स्टॅनकोव्हिक बिग बॉसच्या आठव्या पर्वात झळकली होती. शेवटच्या पाच स्पर्धकांपर्यंत या कार्यक्रमात ती टिकली होती. या कार्यक्रमातून बाहेर पडल्यानंतर केवळ दीड महिने चेहऱ्यावर आलेले पिम्पल्स कमी करण्यातच गेले असे ती सांगते. या कार्यक्रमात ती तीन ते चार महिने होती. या दरम्यान बिग बॉसच्या घरात बनवले जाणारे अतिशय तिखट जेवण खाण्याशिवाय तिच्याकडे पर्याय नव्हता. जेवणाशिवाय खाण्याच्या इतर सगळ्या गोष्टी घरात मोजून मापून दिल्या जात असत. या खाण्यामुळे तिच्या चेहऱ्यावर खूप पिम्पलस आले होते. चेहरा अतिशय वाईट दिसत होता. त्यामुळे बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यावर सगळ्यात पहिल्यांदा चेहऱ्यावर ट्रीटमेंट घेतली असे नताशा सांगते.