Join us

यह उन दिनो की बात है या मालिकेत समीर दिसणार या अभिनेत्याच्या लूकमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2018 14:32 IST

महाविद्यालयाचा पहिला दिवस नेहमीच प्रत्येकासाठी रोमांचक असतो. आपल्या आयुष्यातील नवीन अध्यायचा हा उंबरठा ठरतो. पण शाळेच्या आठवणी या आयुष्यभर ...

महाविद्यालयाचा पहिला दिवस नेहमीच प्रत्येकासाठी रोमांचक असतो. आपल्या आयुष्यातील नवीन अध्यायचा हा उंबरठा ठरतो. पण शाळेच्या आठवणी या आयुष्यभर आपल्या डोक्यात ताज्यातवान्या असतात. शाळेमध्ये असताना नेहमीच गणवेश घालावा लागतो. पण कॉलेजमध्ये गेल्यावर फॅशनेबल कपडे घालून आपले फॅशन स्टेटमेंट जगासमोर आणायला मिळते. सोनी एन्टरटेनमेंट टेलिव्हिजनच्या 'यह उन दिनो की बात है या चित्रपटातील समीरची भूमिका साकारत असलेला रणदीप राय या मालिकेच्या आगामी भागांचे चित्रीकरण करण्यासाठी प्रचंड उत्सुक आहे. कारण या मालिकेतील त्याचा लूक आता पूर्णपणे बदलणार आहे. रणदीप हा त्याच्या फिटनेसच्याबाबतीत नेहमीच सतर्क असतो. त्याचमुळे त्याला बॉलिवूडचा फिट अभिनेता अक्षय कुमार खूप आवडतो. रणदीप हा अक्षयचा फॅन असल्याने त्याने प्रॉडक्शन हाऊसला विनंती केली की, त्याचा या मालिकेतील लूक हा अक्षयसारखा असावा. त्यामुळे आता कॉलेजमध्ये प्रवेश केलेल्या रणदीपचा लूक नवव्दच्या दशकात अक्षय कुमारचा जसा लूक होता तसा असणार आहे. लांब केस, जीन्स, लांब बूट आणि सरळ कॉलर असलेल्या शर्टमध्ये अक्षय कुमारने नव्वदीच्या दशकातील महाविद्यालयीन युवकांना प्रभावित केले होते. समीर नेहमी खोड्या करणारा मुलगा म्हणून शाळेत ओळखला जात होता. आता तो महाविद्यालयात प्रवेश घेणार आहे. त्याच्या नव्या अवतारात आता तो महाविद्यालयीन आयुष्याचा आनंद घेताना दिसणार आहे. याविषयी रणदीपशी संपर्क साधला तो सांगतो, "नव्वदच्या दरम्यान प्रत्येक अभिनेत्याची वेगळी शैली होती. अक्षयच्या लूकवर तर त्याकाळात सगळेच फिदा होते. त्याच्या त्या काळातील सर्व चित्रपटांमध्ये अॅक्शन स्टारच्या भूमिकेत दिसला. आता आमच्या मालिकेमध्ये कॉलेजचे कथानक सुरू झाले आहे. त्यासाठी आम्ही लवकरच शूटिंगला सुरुवात करणार आहोत. त्यामुळे मी प्रॉडक्शन हाऊसला विनंती केली की माझा लूक हा अक्षयच्या नव्वदच्या दशकातील त्याच्या हिट चित्रपटांसारखा असावा. माझ्या टीमला देखील माझी ही युक्ती आवडली आणि त्यांनी त्या दिशेने काम सुरू केले आहे. अक्षय हा खूप चांगला अभिनेता असल्याने त्याचा लूक घेणे हा एक विलक्षण अनुभव असणार आहे".  Also Read : ​यह उन दिनो की बात है या मालिकेतील आशी सिंग जपून ठेवणार मालिकेच्या या आठवणी