Join us
Daily Top 2Weekly Top 5

गौहर-जैदच्या संगीत सेरेमनीत इस्माइल दरबारचं गाणं ऐकून, यूजर्स म्हणाले 'शादी है या तलाक'? Video viral...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2020 17:16 IST

गौहर आणि जैदची लव्हस्टोरी लॉकडाऊनमध्ये सुरु झाली होती.

गौहर खान आणि जैद दरबार यांचा निकाह आज मुंबईत मोठ्या थाटात पार पडला. या लग्नसोहळ्याला कुटुंबीय,नातेवाईक यांच्यासह इंडस्ट्रीतील मित्र-मैत्रिणींनी हजेरी लावली होती. निकाह सेरेमनीमधील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. गौहर आणि जैदची लव्हस्टोरी लॉकडाऊनमध्ये सुरु झाली होती. 22 डिसेंबरपासून लग्नाच्या फंक्शना सुरुवात झाली होती. ज्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतायेत. आता गौहर आणि जैदच्या संगीत सेरेमनीमधील एक व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून यूजर्सना प्रश्न पडला आहे की, लग्न होतोय की घटस्फोट? 

जैद दरबार हा बॉलिवूडचे सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक इस्माईल दरबार यांचा मुलगा आहे. त्यामुळे नात्याने इस्माईल दरबार गौहर खानचा सासरा होतात. संगीत सेरेमनीमध्ये इस्माईल यांनी बरीच गाणी गायली. पण त्यांनी एक असे गाणे गायले की यूजर्स या व्हिडिओवर कमेंट करायला लागले.

या व्हिडिओमध्ये इस्माईल दरबार 'हम दिल दे चुके सनम' सिनेमातील 'तडप तड़प के आस दिल से अह निकलत राही' हे गाणं गाताना दिसतायेत. गौहर आणि जैद हे दोघेही  गाण्यादरम्यान वडिलांना साथ देताना दिसतायेत.  हा व्हिडीओ समोर येताच यूजर्सनी इस्माईल यांच्या गाण्यावर कमेंट करायला सुरुवात केली. यूजर्स म्हणाले, लग्न आहे की घटस्फोट होतोय? आतापर्यंत साडेतीन लाखाहून अधिक व्हूज या व्हिडीओला मिळाले आहेत. 

टॅग्स :गौहर खान