इश्क का रंग सफेदला आणखी एक धक्का
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2016 12:24 IST
इश्क का रंग सफेद या मालिकेतील इशा सिंगने काहीच दिवसांपूर्वी ही मालिका सोडली होती. इशाच्या लोकप्रियतेचा या मालिकेच्या टिआरपीवर ...
इश्क का रंग सफेदला आणखी एक धक्का
इश्क का रंग सफेद या मालिकेतील इशा सिंगने काहीच दिवसांपूर्वी ही मालिका सोडली होती. इशाच्या लोकप्रियतेचा या मालिकेच्या टिआरपीवर चांगलाच परिणाम झाला होता. तिच्यानंतर या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणाऱ्या मिशाल रहेजाने या मालिकेला रामराम ठोकला आहे. ही मालिका पूर्वी आठवड्यातून पाच वेळा दाखवली जात होती. पण आता ती आठवड्यातून सात वेळा दाखवण्याचा निर्णय वाहिनीकडून घेण्यात आला आहे. त्यासाठी कलाकारांना अधिक वेळ चित्रीकरण करावे लागत आहे. चित्रीकरणाचे दिवस वाढल्यामुळे मिशालने निर्मात्यांकडून पैसे वाढवून मागितले होते. पण त्याची ही मागणी पूर्ण न झाल्याने त्याने ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे.