Join us
Daily Top 2Weekly Top 5

ईशा केसकर म्हणतेय ह्या व्यक्तीची जागा मला घेता येणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2018 16:13 IST

जुन्या शनायाचे पात्र जिवंत करणे तितकेच अवघड असल्याचे मत ईशा केसकरने इन्स्टाग्रामवर व्यक्त केले आहे.

ठळक मुद्देशनायाच्या भूमिकेत आता ईशा केसकर

माझ्या नवऱ्याची बायको’ या लोकप्रिय मालिकेतील ‘शनाया’च्या भूमिकेतून अभिनेत्री रसिका सुनील घराघरात पोहचली. या मालिकेत तिने निगेटिव्ह भूमिका केली असली तरी तिच्या अभिनयाचे खूप कौतूक झाले. मात्र तिला पुढील शिक्षणासाठी ही मालिका सोडावी लागली आणि आता त्या जागी शनायाचे पात्र ईशा केसकर ही भूमिका साकारत आहे. ईशाने शनायाचे पात्र घेऊन या मालिकेत एन्ट्री केली आहे. परंतु एका नविन कलाकाराने आधीसारखे कॅरेक्टर नव्याने जिवंत करणे हे तितकच अवघड असल्याचे मत ईशा केसकरने इन्स्टाग्रामवर व्यक्त केले आहे.

ईशा म्हणाली की, रसिका सुनीलने जुन्या शनायाची भूमिका उत्तमरित्या साकारली यात काहीच शंका नाही आणि हीच भूमिका माझ्या वाट्याला आली आहे. एवढ्या चिकाटीने, कष्टाने बांधलेले कॅरेक्टर सोडून जाणे सोपे नाही. पण एखाद्या नवीन कलाकाराने ते पुन्हा आधीसारखे नव्याने जिवंत करणे तितकेच अवघड आहे. त्याचप्रमाणे मला जुन्या शनायाची जागा घेता येणार नाही. पण या भूमिकेसाठी मी शंभर टक्के प्रयत्न करेन. त्याचबरोबर तुमच्या मोठ्या मनाच्या छोट्याशा कोपऱ्यात नवीन शनायाला जागा द्याल अशी आशा तिने व्यक्त केली आहे. 

 तुमच्या आधाराशिवाय आणि आशीर्वादाशिवाय शनाया अपूर्ण आहे. बानूला तर तुम्ही तुमच्या मनावर राज्य करु दिलेत आणि त्यासाठी मी तुम्हा सगळ्यांची ऋणी आहेच. मात्र माझ्या या पात्राविषयी मी तुमच्या चांगल्या, वाईट टीका, कौतुक अशा सर्वच प्रतिक्रियांची वाट पाहत आहे. ते सगळे माझ्यासाठी गरजेचे आहे, असे तिने इंस्टाग्राम पोस्टवर लिहिले आहे.नवीन शनाया प्रेक्षकांना भावते का हे पाहणे कमालीचे ठरणार आहे. 

टॅग्स :माझ्या नवऱ्याची बायकोईशा केसकररसिका सुनिल