यशला सोशल नेटवर्किंगचा तिटकारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2016 17:45 IST
आज सगळेच सोशल नेटवर्किंगच्या अधीन गेले आहेत. पण सोशल नेटवर्किंग मला अजिबातच आवडत नाही असे मत अभिनेता यश टौंकचे ...
यशला सोशल नेटवर्किंगचा तिटकारा
आज सगळेच सोशल नेटवर्किंगच्या अधीन गेले आहेत. पण सोशल नेटवर्किंग मला अजिबातच आवडत नाही असे मत अभिनेता यश टौंकचे आहे. सोशल नेटवर्किंगमुळे लोकांनी एकमेकांना फोन करणे बंद केले आहे. सगळे केवळ एकमेकांच्या फोटोवर लाईक आणि कमेंट करत असतात असे यशचे मत आहे. यशची पत्नी अभिनेत्री गौरी आणि यश-गौरीची मुलगी हे दोघेही सोशल नेटवर्किंगवर चांगलेच अॅक्टिव्ह आहेत. त्या दोघीही यशला नेहमीच सोशल नेटवर्किंगला अकाऊंट सुरू करायला सांगत असतात. पण सोशल नेटवर्किंग ही गोष्टच यशला पटत नसल्याने तो त्यापासून दूर पळतो असे तो सांगतो.