Join us
Daily Top 2Weekly Top 5

उर्फी जावेदला अटक?, पोलिसांनी ताब्यात घेतानाचा व्हिडीओ होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2023 10:24 IST

उर्फी जावेदचा पोलिसांनी ताब्यात घेतानाच व्हिडीओ व्हायरल होतोय.

उर्फी जावेद तिच्या अतरंगी अंदाजासाठी लोकप्रिय आहे, परंतु कधीकधी तिच्या फॅशनमुळे तिला खूप ट्रोलही केलं जातं. पण यामुळे उर्फीला काहीच फरक पडत नाही. ती तरीही हटके फॅशन सतत करत असते. आता उर्फीचा एक व्हिडिओ चर्चेत आला आहे, ज्यात  उर्फीला पोलीस अटक करुन पोलीस ठाण्यात घेऊन जाताना दिसतेय. मात्र हा व्हिडिओ खरा आहे की प्रँक आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. 

व्हिडिओमध्ये उर्फी एका रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना दिसत आहे. दरम्यान, मुंबई पोलिसांच्या दोन महिला पोलिस येतात आणि उर्फीला त्यांच्यासोबत येण्यास सांगतात. यावर उर्फी त्यांना कारण विचारात आणि रेस्टॉरंटबाहेर पोलिसांशी हुज्जत घालण्यास सुरुवात करते. यानंतर उर्फी जावेद सतत पोलीस ठाण्यात जाण्यास नकार देत आहे. पण दोन्ही महिला अधिकारी तिला गाडीतून निघून जातात.  हा व्हिडीओ समोर आल्यानंतर तिचे चाहतेत चिंतेत पडले आहेत.

उर्फी जावेदचा हा व्हिडिओ पापाराझी विरल भयानीने शेअर केला आहे. शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, उर्फी मॉर्निंग कॉफी रन करताना दिसत आहे जेव्हा कथित पोलिस अधिकार्‍यांनी तिला  ताब्यात घेतले. व्हिडिओमध्ये एक महिला पोलीस अधिकारी उर्फीला तिच्यासोबत पोलीस ठाण्यात येण्यास सांगताना दिसत आहे. जेव्हा उर्फीने तिला ताब्यात घेण्याचे कारण विचारले तेव्हा अधिकाऱ्याने उत्तर दिले, "इतके छोटे कपडे घालून कोण फिरते?"

उर्फीचा व्हायरल व्हिडिओ पाहिल्यानंतर सोशल मीडिया यूजर्स कन्फ्यूज झाले आहेत. एका युजरने लिहिले - 'मला हा  प्रँक असल्यासारखे वाटते आहे.' दुसर्‍याने लिहिले - 'हि मस्करी करतेय असं दिसते.' 

टॅग्स :उर्फी जावेद