Join us
Daily Top 2Weekly Top 5

राकेश बापट रिलेशनशिपमध्ये की सिंगल? राखी सावंत खुलासा करत म्हणाली "त्याच्या आयुष्यात ती आहे"

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2026 14:39 IST

राकेश रिलेशनशिपमध्ये आहे की सिंगल याबद्दल राखीनं खुलासा केला. 

Rakhi Sawants On Raqesh Bapat : 'ड्रामा क्वीन' राखी सावंत सध्या 'बिग बॉस मराठी ६' मुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या पर्वात वाईल्ड कार्ड म्हणून सहभागी झालेल्या राखीने सदस्यांमध्ये भांडणं लावली आणि त्यामुळे वाद झाले. राखीनं बिग बॉसमध्ये राडा घातला असला तरी, तिची हळवी बाजूसुद्धा प्रेक्षकांना पाहायला मिळाली. राखी ही राकेश बापटच्या प्रेमात वेडी झालेली दिसली. मात्र, राकेशनं तिला कायम चांगली मैत्रीण मानलं. बिग बॉसच्या घराबाहेर आल्यावर राखीनं तिचं राकेशवरचं एकतर्फी प्रेम खरं असल्याचं सांगितलं. तसेच राकेश रिलेशनशिपमध्ये आहे की सिंगल याबद्दलही खुलासा केला. 

राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत  राखी म्हणाली, "माझ्या आयुष्यात आधी इतक्या काही वेदनादायक गोष्टी घडल्या होत्या की माझं फक्त शरीर जिवंत होतं, मनाने मी मेल्यासारखी झाले होते. पण राकेश बापट मला आवडला. आम्ही भांडलो, हसलो, नाचलो. त्याच्यातलं मला नेमकं काय आवडलं, हे मलाही माहीत नाही, पण मी त्याच्या प्रेमात पडले आहे".

राखीने एका रंजक योगायोगाचा उल्लेख केला. ती म्हणाली, "एका ज्योतिषाने मला आधीच सांगितलं होतं की, तुझ्या आयुष्यात एक घटस्फोट झालेला मुलगा येईल. मला माहीत नव्हतं की तो राकेश असेल. राकेशने मला सांगितलं की त्याचा घटस्फोट झाला आहे आणि तो शमिता शेट्टीसोबतही आता नात्यात नाहीये".

राखी पुढे म्हणाली की, सुरुवातीला राकेशने तो एकटा (Single) असल्याचे सांगितले होते. मात्र, जवळीक वाढल्यावर त्याने त्याच्या आयुष्यात कोणीतरी असल्याचे कबूल केले. "आता ती मुलगी कोण आहे हे मला माहीत नाही, पण माझ्या मनात राकेशबद्दल कायम भावना राहतील. आता मी त्याच्या नावावर उरलेलं आयुष्य काढणार आहे", असे राखीने म्हटले.

कोण होणार विजेता?

'बिग बॉस मराठी सीझन ६' चा फिनाले आता जवळ आला आहे. घरात राकेश बापट, विशाल कोटियन, तन्वी कोलते, दीपाली सय्यद आणि अनुश्री माने टॉप ५ सदस्य राहिले आहेत. बिग बॉसचा हा प्रवास संपायला आता शेवटचे काहीच तास बाकी आहेत. आज रात्री या पर्वाची ट्रॉफी कोण उचलणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Rakhi Sawant reveals Raqesh Bapat's relationship status: 'He has someone'.

Web Summary : Rakhi Sawant confessed her feelings for Raqesh Bapat, stating that while he initially claimed to be single, he later admitted to having someone in his life. Rakhi declared she would live her life in his name.
टॅग्स :राकेश बापटराखी सावंतबिग बॉस मराठी ६