बेहद या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार इंटिमेट सीन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2017 11:33 IST
छोट्या पडद्यावर इंटिमेट सीन दाखवला जाणे यात आता काही नवीन नाही. इंटिमेट सीनचा ट्रेंड छोट्या पडद्यावर सध्या चांगलाच गाजत ...
बेहद या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार इंटिमेट सीन
छोट्या पडद्यावर इंटिमेट सीन दाखवला जाणे यात आता काही नवीन नाही. इंटिमेट सीनचा ट्रेंड छोट्या पडद्यावर सध्या चांगलाच गाजत आहे. अनेक मालिकांमध्ये आपल्याला इंटिमेट सीन पाहायला मिळत आहेत. बडे अच्छे लगते है, मर्यादा... लेकीन कब तक, सपने सुहाने लडकपन के, कितनी मोहोब्बत है, परिचय, मिले जब हम तुम, दिल मिल गये, प्यार को क्या नाम दूँ यांसारख्या मालिकेत इंटिमेट सीन दाखवण्यात आले आहेत. आता असाच काहीसा सीन बेहद या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. अर्जुनप्रती असलेले प्रेम मायाने आता कबूल केले आहे. अर्जुनवर आपले अतोनात प्रेम आहे हे मायाने व्यक्त केल्यानंतर आता माया आणि अर्जुनचा विवाह होणार आहे. सध्या मालिकेत अर्जुन आणि मायाच्या लग्नाची तयारी सुरू असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. माया अर्जुनसोबत लग्न करत असली तरी अर्जुनला गमावण्याची तिच्या मनात सतत भीती आहे. त्यामुळे आता ती स्वतःचे नाव अर्जुनच्या छातीवर कोरणार आहे. माया स्वतः अर्जुनच्या छातीवर तिचे नाव कोरणार आहे. या दृश्याचे चित्रीकरण नुकतेच करण्यात आले. हा सीन अधिकाधिक इंटिमेट दिसावा यासाठी प्रयत्न करण्यात आले. कुशल टंडन आणि जेनिफर विंगेट या दोघांनी या दृश्यात कोणतीही कमतरता पडू नये यासाठी प्रयत्न केले. या दृश्याच्या दरम्यान अधिक रोमँटिक वातावरण निर्माण करण्यासाठी रामलीला या चित्रपटातील अंग लगा दे हे गाणे बँकराऊंडला वाजवण्यात आले होते. बेहदमधील हे दृश्य चित्रीत करण्यासाठी टीमने खूप मेहनत घेतली आहे. हे दृश्य सगळ्यांना आवडेल अशी या मालिकेच्या टीमला खात्री आहे.