Join us
Daily Top 2Weekly Top 5

'अनुपमा' मालिकेसाठी रुपाली गांगुलीऐवजी 'ही' मराठी अभिनेत्री होती पहिली पसंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2023 16:14 IST

Anupama Serial : 'अनुपमा' मालिका नाकारल्याचा आता मराठमोळ्या अभिनेत्रीला होतोय पश्चाताप

अभिनेत्री नेहा पेंडसे (Nehha Pendse) हिने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर मराठीसह हिंदी सिनेइंडस्ट्रीत आपले स्थान निर्माण केले आहे. सध्या नेहा पेंडसे चर्चेत आली आहे. नुकतेच तिने मे आय कम इन मॅडम या मालिकेतून छोट्या पडद्यावर कमबॅक केले आहे. या मालिकेच्या निमित्ताने तिने मुलाखत दिली आहे. यात तिने तिच्या आयुष्याशी संबधीत बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला आहे. यावेळी नेहाने छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘अनुपमा’ हातून सोडल्याची आता खंत वाटत असल्याचं म्हटलं आहे.

स्टार प्लस वाहिनीवरील अनुपमा मालिका सध्या खूप गाजते आहे. या मालिकेनं अल्पावधीतच रसिकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील मुख्य म्हणजेच अनुपमाची भूमिका अभिनेत्री रुपाली गांगुली साकारते आहे. परंतु आधी ही भूमिका नेहा पेंडसेच्या वाट्याला आली होती. तिने ही भूमिका स्वतः नाकारली आणि आता तिला याचे वाईट वाटत असल्याचे तिने म्हटले आहे.

याबद्दल नेहा पेंडसे म्हणाली की, ‘मला या पात्राशी कनेक्ट होता येत नव्हते. अनुपमाची पात्र हे असे आहे, जे प्रत्येकासाठी बलिदान देत असते. मी असे एखादे पात्र चित्रपटासाठी नक्कीच साकारू शकले असते. मात्र, टीव्ही मालिका या वर्षानुवर्षे चालतात, त्यामुळे टीव्ही मालिकांमध्ये हे असे पात्र निभावणे कठीण आहे. मात्र, आता आपल्याला आपल्या त्या निर्णयाचा पश्चात्ताप होतो आणि भविष्यात जर अनुपमासारखी मालिका पुन्हा ऑफर झाली तर नक्की करेन.

टॅग्स :नेहा पेंडसे