Join us

पानी के अंदर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2016 15:22 IST

मराठी चित्रपट, मालिका तांत्रिकदृष्ट्या सक्षम होत आहेत. चित्रपटांप्रमाणेच मालिकांमध्येदेखील विविध प्रयोग केले जात आहेत. गोठ या आगामी मालिकेत प्रेक्षकांना ...

मराठी चित्रपट, मालिका तांत्रिकदृष्ट्या सक्षम होत आहेत. चित्रपटांप्रमाणेच मालिकांमध्येदेखील विविध प्रयोग केले जात आहेत. गोठ या आगामी मालिकेत प्रेक्षकांना असाच वेगळा प्रयोग पाहायला मिळणार आहे. या मालिकेत एका दृश्याचे नुकतेच अंडरवॉटर चित्रीकरण करण्यात आले. कोणत्याही मालिकेत अंडरवॉटर चित्रीकरण करण्याची ही पहिलीच वेळ आहे. हिंदी चित्रपट आणि मालिकांसाठी काम केलेले छायालेखक अभिषेक बासूच्या मार्गदर्शनाखाली हे दृश्य चित्रीत करण्यात आले. अभिषेक हा अनुराग बासूचा भाऊ आहे. अनुरागने बर्फी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. फिल्मसिटीमध्ये या अंडरवॉटर दृश्याचे चित्रीकरण करण्यात आले. खरे तर अंडरवॉटर चित्रीकरण करणे हे खूप खर्चिक असते. पण अभिषेकने मांडलेली संकल्पना सगळ्या टीमला आवडल्याने वाहिनीने आणि निर्मात्यांनी हा खर्च उचलण्याचे ठरवले.