Join us
Daily Top 2Weekly Top 5

'इंद्रायणी' मालिकेत इंदू रुसली आपल्या विठुरायावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2024 19:06 IST

Indrayani Serial : 'कलर्स मराठी' वाहिनीवरील 'इंद्रायणी' या लोकप्रिय मालिकेतील इंदूदेखील विठ्ठलावर रुसलेली पाहायला मिळणार आहे.

'कलर्स मराठी' वाहिनीवरील 'इंद्रायणी' या लोकप्रिय मालिकेतील इंदूदेखील विठ्ठलावर रुसलेली पाहायला मिळणार आहे. इंदू विठ्ठ्लाचं अनोखं नातं आहे. इंदूसाठी विठुराया हा पाठीराखा आहे. आजवर या पाठीराख्याने तिच्या सर्व इच्छा पूर्ण केल्या आहेत. पण आता विठुरायाच्या लाडक्या इंदूने विठ्ठल मंदिरात न जाण्याचा निर्णय घेतला आहे.

आपल्या माणसांवर अन्याय झाल्याने इंदूने तिच्या विठुरायाशी अबोला धरला आहे. विठुराया झोपला असून तो उठेपर्यंत ताट वाजवताना ती दिसून आली होती. इंदूच्या मते,"माझ्या माणसांवर अन्याय होत असताना विठुराया कुठे होता? विठुराया झोपला आहे". विठुराया जोपर्यंत जागा होत नाही तोपर्यंत इंदूने त्याच्यासोबत कट्टी घेतली आहे. इंदू तिच्या लाडक्या विठुरायावर किती दिवस रुसलेली दिसून येणार याकडे सर्वांचच लक्ष लागलं आहे.

विठुराया इंदूची प्रत्येक गोष्ट ऐकत असूनही नारायणी आणि विंझेचं लग्न त्याला रोखता आलं नसल्याने इंदू पाठिराख्यावर नाराज आहे. आता विंझेचे खोटं नाटक इंद्रायणी सर्वांसमोर उघडकीस आणणार का हे पाहावे लागेल. इंदू आणि विठ्ठलाचं एक वेगळचं कनेक्शन असलेलं प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. पण आता इंदूच्या हाकेला तो धावून आल्याने तिने रुसुन बसून आपली नाराजी व्यक्त केली आहे.

टॅग्स :कलर्स मराठी