Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘इंद्रायणी’ मालिकेत मोठा ट्विस्ट! श्रीकलाचं बिंग फुटणार? प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 18:36 IST

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘इंद्रायणी’ सध्या प्रचंड तणावपूर्ण आणि निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचली आहे.

Indrayani Serial: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘इंद्रायणी’ सध्या प्रचंड तणावपूर्ण आणि निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. दिग्रसकर वाड्यात एकामागोमाग एक घडणाऱ्या अनपेक्षित घटनांसोबत आता धक्कादायक खुलासे देखील होणार आहेत. श्रीकलाभोवती असलेली शंका हळूहळू एका मोठ्या रहस्याकडे इशारा करू लागते. तिचा खरा हेतू,  तिचा भूतकाळ आणि दिग्रसकरांविरुद्ध असलेले मनसुबे अखेर सगळ्यांसमोर येणार आहेत.

श्रीकलाबाबत इंदू आणि आनंदीच्या लक्षात आलेल्या काही संशयास्पद हालचाली, एका अनोळखी व्यक्तीची अस्पष्ट झलक आणि त्यातून उघड होत जाणारे धागेदोरे इंद्रायणीच्या शंकेला अधिकच बळ देतात आणि एका मोठ्या खुलाशाकडे येऊन पोहोचतात. इंद्रायणी आणि आनंदीकडे आता श्रीकलाविरुद्ध बरेच पुरावे आहेत. ज्या क्षणाची सगळे आतुरतेने वाट पाहत होते, तो क्षण अखेर या मालिकेत पाहायला मिळणार आहे. अख्ख्या दिग्रसकरांसमोर श्रीकलाचा पर्दाफाश होणार आहे.

इंद्रायणी ठामपणे श्रीकलाकडे बोट दाखवत, “आज सगळ्यांना कळालंय… ही श्रीकला किती...!” असं म्हणताच वाड्यात खळबळ उडते. शकुंतलाचा कापऱ्या आवाजातला सवाल, आनंदीबाईंचा कठोर निर्णय आणि श्रीकलाची गोंधळलेली अवस्था या सगळ्यामुळे परिस्थिती खूप तणावपूर्ण होते. श्रीकलाचा खरा चेहरा सगळ्यांसमोर येताच तिला घराबाहेर काढण्यासाठी पाऊल उचलले जात असतानाच अचानक पोपटरावांचा प्रवेश होतो. ते श्रीकलाच्या बाजूने उभे राहत ठाम इशारा देत सगळ्यांना आव्हान देतात की, “घराबाहेर श्रीकला नाही… तुम्ही सगळे जाणार… आत्ताच्या आत्ता!” हा हस्तक्षेप केवळ वाद थांबवत नाही, तर आणखी मोठ्या रहस्याची चाहूल देतो. पोपटराव, श्रीकला आणि या सगळ्या घडामोडींचा नेमका संबंध काय? दिग्रसकर कुटुंबासमोर उभे राहिलेले अनेक प्रश्न मोठ्या संकटाचं वादळ घेऊन येणार आहेत.

हादरवून टाकणारे धक्कादायक खुलासे आणि नाट्यमय वळणांसह ‘इंद्रायणी’ मालिका आता एका जबरदस्त टप्प्याकडे वाटचाल करत आहे. या रहस्यांचा उलगडा ‘इंद्रायणी’ मालिकेतील आगामी भागात पाहायला मिळणार आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Indrayani Serial: Shocking twist! Will Shrikala's truth be revealed?

Web Summary : The 'Indrayani' serial is at a crucial juncture. Shrikala's suspicious activities raise doubts, leading to a potential exposé in front of the Digraskar family. Popatrao's unexpected intervention adds another layer of mystery, hinting at deeper secrets and future turmoil for the family.
टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटी