कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका इंद्रायणी(Indrayani Serial)चे नुकतेच ५०० भाग पूर्ण झाले आहेत आणि आता पुढचा पल्ला गाठण्यासाठी संपूर्ण टीम सज्ज झाली आहे. सध्या मालिका एका महत्त्वाच्या वळणावर आली आहे. इंद्रायणीच्या स्वप्नात पुन्हा एकदा दैवी संकेत दिसतो. मोठं संकट जवळ येत असल्याचं भाकीत तिच्या मनात उमटतं. हे संकट नेमकं कोणतं, कोणावरून येणार आणि दिग्रसकर घराणं कसं गुंतणार याविषयी मात्र अद्याप गूढ दाटलेलं आहे. पण या गूढामागे जी व्यक्ती आहे ती म्हणजे श्रीकला.
ती इंद्रायणी आणि तिच्या संपूर्ण परिवाराला नुकसान पोहोचवण्यासाठी, तिच्या जवळच्यांना तिच्यापासून हिरावून घेण्यासाठी आली आहे. आणि तिचं पहिलं लक्ष्य आहे शकुंतलाकाकू, ज्यांना इंदू आईसारखी मानते. श्रीकलाचा असं कारण्यामागचा नक्की कोणता हेतू आहे ? तिचं इंदू आणि दिग्रसकर कुटुंबाशी वैर का आहे? हे हळूहळू उलगडेल.
इंदू स्वतःला आणि तिच्या कुटुंबाला कशी वाचवणार ?
आतापर्यंत श्रीकला बाबतीत मनात अडी ठेवणारी इंद्रायणी व्यंकू महाराजांच्या सांगण्यावरून श्रीकलाशी मैत्री करते पण श्रीकलाविषयी काहीतरी कुठेतरी चुकते आहे याची सतत रुखरुख इंदूच्या मनाला लागली आहे. दोघीं मधले गैरसमज दूरहोऊन मैत्री झालेली दिसणार आहे. पण, हे काही क्षणांसाठी असणार का ? इंदू घरी परतल्यावर अधूसोबतची तिची हलकी–फुलकी नोकझोक, त्याचं फोनमध्ये गुंतून जाणं आणि इंदूचं खट्याळ प्रेमळ चिडवणं, या सगळ्यामुळे वातावरण हलकं झालं. पण या हसऱ्या क्षणांमागे श्रीकलाचा खरा हेतू काय आहे, हा प्रश्न मात्र कायम आहे. याचदरम्यान, दुसरीकडे श्रीकलाचं घर, तिच्या भोवती पसरलेलं गूढ वातावरण आणि तिच्या आयुष्यात सोबतीला असणारी रत्नासोबतचे संवाद या मालिकेला थरारक वळण देत आहेत. इंद्रायणीची भक्ती आणि श्रीकलाचे कपटी डाव यांच्या संघर्षातून इंदू स्वतःला आणि तिच्या कुटुंबाला कशी वाचवणार ? हे पाहणं प्रेक्षकांसाठी सर्वांत रोमांचक ठरणार आहे. इंद्रायणीच्या भक्तीच्या प्रकाशासमोर,उभी ठाकणार श्रीकलाची काळोखी छाया तेव्हा मालिकेत पुढे काय होणार हे जाणून घेण्यासाठी मालिका पाहावी लागेल.