इंडियन आयडल लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2018 13:48 IST
गाण्याचा सर्वात मोठा रिऑलिटी शो म्हणून ओळखला जाणारा, सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हीजनचा इंडियन आयडॉल कार्यक्रम त्याच्या 10व्या मोसमात पुन्हा येतो ...
इंडियन आयडल लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला
गाण्याचा सर्वात मोठा रिऑलिटी शो म्हणून ओळखला जाणारा, सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हीजनचा इंडियन आयडॉल कार्यक्रम त्याच्या 10व्या मोसमात पुन्हा येतो आहे. 2017 मध्ये प्रदर्शित झालेल्या याआधीच्या कार्यक्रमाला तुडुंब प्रतिसाद मिळाला होता, आणि उभारत्या गायकांना त्यात भाग घेऊन हे महत्वाचे विजेतेपद मिळवताना आपण पहिले होते. येणार्या मोसमात, गाण्यातील पुढील प्रतिभा शोधण्यासाठी कार्यक्रम सज्ज होत आहे. या मोसमातील कार्यक्रमाचे परीक्षक कोण असतील, याविषयी सिनेक्षेत्रात जोरदार चर्चा सुरू आहे.कित्येक रियालिटी शोमध्ये सहभागी झालेल्या आणि या शोच्या मागील मोसमात पाहुणा परीक्षक म्हणून काम पाहिलेला विशाल ददलानी सुंदर व गोंडस नेहा कक्करसह परीक्षक म्हणून काम बघेल. नेहा कक्कर बाबत एक विशेष गोष्ट म्हणजे, ही गायिका, जीने आज खूप यश प्राप्त केले आहे, ती एकेकाळी इंडियन आयडॉलचा भाग होती, आणि सर्वोत्कृष्ठ 10 कलाकारांमध्ये निवडली गेली होती. आणि एक परीक्षक , ज्याची विनोदबुद्धी सर्वात चांगली आहे, आणि शायरी गायची सवय असलेली एक कलाकार या कार्यक्रमात पुनरागमन करीत आहे. ही व्यक्ती इतर कोणीही नसून आपले सर्वांचे लाडके गायक आणि संगीतकार – अन्ंनू मलिक आहेत. इंडियन आयडॉलच्या 10व्या मोसमामधील सर्वोत्कृष्ट गायक निवडण्याचे काम आता अन्नू मलिक, नेहा कक्कर आणि विशाल ददलानी यांच्या हातात आहे.याविषयी कसे वाटते आहे, याबद्दल विशाल ददलानी म्हणतात, इंडियन आयडॉल 10च्या येणार्या मोसमचा परीक्षक म्हणून काम करायला मी अतिशय उत्सुक आहे. इंडियन आयडॉल ज्युनिअरशी असलेल्या माझ्या संबंधांबरोबरच, मी कित्येक रियालिटी शोजचा एक भाग आहे, आणि मला हे संगीतलेच पाहिजे,की, भारतीय दूरदर्शनवरील इतर कोणत्याही संगीताच्या कार्यक्रमापेक्षा इंडियन आयडॉलचा दर्जा नक्कीच चांगला आहे. प्रतिभेच्या अविष्काराची कमाल यामध्ये पाहायला मिळते, सहभागी कलाकार त्यांची गायनकला या मंचावर अशा काही तयारीने सादर करतात, की प्रेक्षकांना भारतातील विविधता या एकाच कार्यक्रमात एकाच वेळेस पाहता येते. तर खबर पहिला दो,आम्ही पुन्हा येतोय! मी सहभागी होणार्या प्रत्येक होतकरू गायकांना या मंचावर येऊन त्यांची प्रतिभा आणि तयारी दाखवावी आणि कार्यक्रम जिंकावा असे आवाहन करतो.”अन्नू मलिक म्हणतात, या कार्यक्रमात पुनरागमन करण्यासाठी मी खूपच उत्तेजित झालो आहे. या कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून मी यासोबत काम करतो आहे, आणि देशाभरातील काही अतिशय सुरेख अशा गायन प्रतिभा बघायची संधी मला मिळाली. प्रत्येक अनुभव माझ्या कायमच स्मरणात राहील.मागील मोसमात आपण भारतभरातील काही सर्वोत्कृष्ठ गायक कलाकार पहिले, आणि त्यांच्यामधील स्पर्धा अतिशय कठीण होती. या वेळेस, आम्ही जोमाने परत येतोय ..मी प्रत्येक उदयोन्मुख गायकाला ऑडीशनसाठी येण्याची विनंती करतो. इंडियन आयडॉल हा एक प्रतिष्ठेचा मंच असून त्याने अनेकांचे जीवन बदलले आहे, आणि या शोमध्ये काम करताना मला अतिशय अभिमान वाटत आहे. ऑडीशन्स 1 मे, 2018 रोजी जयपूर येथे, आणि लखनौ, गुवाहाटी, भुवनेश्वर, देहेराडून, चंदिगढ, कोलकाता, हैदराबाद, दिल्ली, इंदूर आणि मुंबई या वेगवेगळ्या शहरांत भारताभरातून सर्वोत्कृष्ठ प्रतिभा निवडण्यासाठी अधिक ऑडीशन्स घेण्यात येतील.