सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील इंडियन आयडॉल हा भारतीय टेलिव्हिजनवरील एक अत्यंत प्रतिष्ठित आणि लोकप्रिय गायन रिएलिटी शो आहे. आणि या कार्यक्रमाने अनेक होतकरू गायकांना राष्ट्रीय मंचावर गाण्याची संधी देऊन त्यांची स्वप्नं पूर्ण केली आहेत. २००४ मध्ये सुरू झालेल्या या शोने देशाला सलमान अली (सत्र १० चा विजेता), सनी हिंदुस्तानी (सत्र ११ चा विजेता) आणि अगदी अलीकडे पवनदीप राजन (सत्र १२ चा विजेता) यांसारखे अद्भुत आवाज दिले आहेत, ज्यांनी आपल्या सुमधुर आवाजाने श्रोत्यांना वेड लावलं. इंडियन आयडॉलचा प्रभाव विविध शहरांमध्ये दिसू लागला आहे. यंदाच्या सत्राच्या मुंबईतील ऑडिशन २४ जुलै रोजी नाहर इंटरनॅशनल स्कूल, नाहर्स अमृत शक्ती कॉम्प्लेक्स, चांदिवली फार्म रोड, ऑफ साकी विहार रोड, अंधेरी (पूर्व) येथे सकाळी 10.30 वाजल्यापासून सुरू होणार आहेत. जयपूर, भुवनेश्वर, गुवाहाटी, पटणा, कोलकाता, इंदूर आणि लखनौनंतर या वाहिनीने देशातील आणखी काही शहरांमध्ये ऑडिशन्स घेण्याचे योजले आहे. चंदिगड, देहरादून आणि दिल्ली जवळ राहणार्या तरुण, उत्साही आणि प्रतिभावान गायकांना या तीन शहरांमध्ये होणार्या ऑडिशनसाठी आमंत्रित करण्यात येत आहे.
Indian Idol 13च्या ऑडिशन्सला सुरूवात, पवनदीप राजनचं या शोनं स्वप्न केलं साकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2022 19:08 IST