Join us

Indian Idol 12: सवाई भटचं गाणं ऐकून मोहम्मद दानिशला कोसळलं रडू, सलमान अलीचीही झाली वाईट अवस्था

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2021 13:12 IST

सवाई भटच्या नव्या गाण्याने इंडियन आयडॉल १२चा स्पर्धक मोहम्मद दानिशला रडवले. यापूर्वी सलमान अलीचेही डोळे पाणावले होते.

इंडियन आयडॉल १२ मधून नुकताच बाहेर पडलेला स्पर्धक सवाई भटचे नवीन गाणे सांसेला प्रेक्षकांचा चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे. या गाण्याला काही दिवसात १५ मिलियनहून जास्त व्ह्युज मिळाले आहेत आणि या गाण्याने पवनदीप राजन- अरूणिता कांजिलालचे गाणे तेरे बगैरलाही मागे टाकले आहे. नुकताच या गाण्यावर इंडियन आयडॉल १०चा विजेता सलमान अलीने इमोशनल व्हिडीओ शेअर केला होता आणि आता या सीझनचा सिंगर मोहम्मद दानिशने इमोशनल व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तो रडताना दिसतो आहे. 

सवाई भटचे नुकतेच सांसे हे गाणे प्रदर्शित झाले आहे आणि या गाण्याला प्रेक्षकांचा खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे. हे गाणे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

मोहम्मद दानिशचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे. या व्हिडीओत मोहम्मद दानिश सवाई भटचे नवीन गाणे सांसे ऐकताना दिसतो आहे आणि ते ऐकताना त्याला अश्रू अनावर झालेले पहायला मिळत आहेत. 

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय सिंगिग रिएलिटी शो इंडियन आयडॉल १२ अंतिम टप्प्यात पोहचला आहे. या आठवड्यात शोमध्ये आशा भोसले पाहुण्या म्हणून उपस्थिती लावताना दिसणार आहे. तसेच निर्माते या सीझनच्या ट्रॉफीचे अनावरणदेखील केले आहे. ट्रॉफीची पहिली झलक सोशल मीडियावर पहायला मिळते आहे.

ही ट्रॉफी पाहून या शोमधील स्पर्धकांचा उत्साह आणखीन वाढला आहे. तर प्रेक्षकदेखील या शोमध्ये कोण बाजी मारतो हे पाहण्यासाठी उत्सुक झाले आहेत.

टॅग्स :इंडियन आयडॉल