छोट्या पडद्यावरील लोकप्रिय सिंगिंग शो इंडियन आयडॉलचा १२ वा सीझन सातत्याने चर्चेत येत असतो. या शोमधील स्पर्धकांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. नुकताच या शोमधून स्पर्धक आशिष कुलकर्णी बाहेर पडला आहे. त्यानंतर आशिषच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर शोला खूप ट्रोल केले. एलिमिनेशननंतर दुःखी झालेल्या आशिष कुलकर्णीने सोशल मीडियावर एक भावूक पोस्टदेखील लिहिली होती. इंडियन आयडॉल १२ चा ग्रॅण्ड फिनाले १५ ऑगस्टला पार पडणार आहे.
एलिमिनेशनबद्दल आशिष कुलकर्णी म्हणाला की, मी पुण्यात राहणारा सामान्य सिंगर आहे.बऱ्याच वर्षांपासून मी प्रयत्न करत होतो की संगीत क्षेत्रात माझे काम व्हावे. सर्वकाही होते, आई वडिलांचा पाठिंबा होता मात्र ती ओळख मिळत नव्हती. मात्र इंडियन आयडॉलमध्ये माझी निवड झाली आणि माझ्या गायन कौशल्याला ओळख मिळाली. मला त्यांनी ट्रेन केले, माझे मार्गदर्शन केले त्यामुळे मी इथपर्यंत पोहचू शकले. मी टॉप ७ पर्यंत पोहचलो. मी कधी असा विचार केला नव्हा. माझे जीवन बदलण्यासाठी ही खूप मोठी संधी होती आणि इथपर्यंत पोहचणे माझ्यासाठी मोठी बाब होती.