Join us

Indian Idol 12 Grand Finale: फक्त ट्रॉफी नव्हे, विनरला मिळणार या गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2021 16:44 IST

Indian Idol 12 Grand Finale: यंदा एक नाही तर दोन विजते? पहिल्यांदाच नवा विक्रम?

ठळक मुद्देआज रात्री 12 वाजता इंडियन आयडलच्या विजेत्याचे नाव घोषित केले जाणार आहे.

‘इंडियन आयडल 12’चा 12 तासांचा ग्रँड फिनाले सुरू (Indian Idol 12 Grand Finale ) झालाये. स्पर्धकांचे एकापेक्षा एक धमाकेदार परफॉर्मन्स, बॉलिवूडच्या दिग्गजांची हजेरी, जय भानुशाली आणि आदित्य नारायणची जबरदस्त होस्टिंग असा रंगीबेरंगी फिनाले सुरू असताना आता या शोचा विजेता कोण असणार? याकडे अख्ख्या देशाचे लक्ष लागले आहे. इंडियन आयडलची चकाकती  ट्रॉफी कोणाला मिळणार आणि कोणाला मिळणार नाही हे काही तासांत कळेल. पण केवळ ट्रॉफी नाही़ यावेळी शोच्या विजेत्यांवर बक्षिसांचा वर्षाव होणार आहे.

रिपोर्टनुसार, यावेळी विजेत्याला मिळणारी रक्कम २५ लाख रुपये आहे. म्हणजेच जो कोणी ‘इंडियन आयडल 12’च्या विजेत्याला 25 लाखांचे रोख बक्षिस मिळणार आहे. याशिवाय विजेत्याला एका सुप्रसिद्ध म्युझिक कंपनीसोबत गाण्याची संधीही मिळणार आहे.  इतकेच नाही तर इंडियन आयडलच्या सर्व 6 फायनलिस्टला लंडनच्या प्रसिद्ध वेंबले स्टेडियममध्ये एक कॉन्सर्ट करण्याची संधीही मिळणार आहे.

एक नाही दोन विजेते?चर्चा खरी मानाल तर या सीझनमध्ये ‘इंडियन आयडल 12’ चे एक नाही तर दोन विजेते असतील. हे प्रत्यक्षात घडले तर या रिअ‍ॅलिटी शोच्या इतिहासातील हा एक विक्रम असेल. बॉलिवूड लाईफला दिलेल्या मुलाखतीत स्पर्धक पवनदीप राजन आणि अरुणिता कांजीलाल यांनी याबाबतचे संकेत दिले.  निर्माते दोन विजेते घोषित करण्याचा विचार करत आहेत, असे ते म्हणाले.आता यात किती तथ्य आहे हे तर आज रात्री 12 च्या ठोक्यालाच कळेल. आज रात्री 12 वाजता इंडियन आयडलच्या विजेत्याचे नाव घोषित केले जाणार आहे.

टॅग्स :इंडियन आयडॉल