Join us
Daily Top 2Weekly Top 5

Indian Idol11 : बूट पॉलिश करणा-या सनीचा व्हिडीओ पाहून भावूक झालेत आनंद महिंद्रा, दिले चॅलेंज

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2019 11:33 IST

उद्योगपती आणि महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्राचे चेअरमॅन आनंद महिंद्रा हे एका बूटपॉलिश करणा-या तरूणाचे फॅन झाले आहेत. होय, बूटपॉलिश करणा-या या तरूणाचे नाव सनी आहे. नुकताच सनी  ‘इंडियन आयडल 11’ या टीव्हीचा लोकप्रिय सिंगींग रिअ‍ॅलिटी शोमध्ये ऑडिशन देताना दिसला होता.

ठळक मुद्देपंजाबच्या बठिंडा येथील अमरपुरा भागात राहणा-या सनीच्या आवाजाने सर्वांना वेड लावले आहे.

उद्योगपती आणि महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्राचे चेअरमॅन आनंद महिंद्रा हे एका बूटपॉलिश करणा-या तरूणाचे फॅन झाले आहेत. होय, बूटपॉलिश करणा-या या तरूणाचे नाव सनी आहे. नुकताच सनी  ‘इंडियन आयडल 11’ या टीव्हीचा लोकप्रिय सिंगींग रिअ‍ॅलिटी शोमध्ये ऑडिशन देताना दिसला होता. त्याच्या ऑडिशनचा व्हिडीओ आनंद महिंद्रा यांनी आपल्या सोशल अकाऊंटवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आनंद महिंद्रा कमालीचे भावूक झालेत.या व्हिडीओत सनी केवळ सुंदर गाणे गात नाही तर त्याच्या आयुष्यातील संघर्षाबद्दलही सांगतो. सनी हा बूटपॉलिश करतो तर त्याची आई पंजाबात फुगे विकते. सनीचा हा व्हिडीओ कुणालाही भावूक करू शकतो. आनंद महिंद्रा यांची स्थितीही वेगळी नव्हती. व्हिडीओ पाहिल्यानंतर त्यांनी भावूक ट्विट केले.

 

‘आयुष्यात शिखर गाठणा-या लोकांकडून शिकण्यासाठी दिवाळीचा दिवस सर्वात चांगली संधी आहे. माझ्या एका मित्राने मला हा व्हिडीओ पाठवला. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर माझ्या मित्राच्या डोळ्यांत अश्रू तरळले होते. मी हा व्हिडीओ युट्यूबवर शोधला. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्याही डोळ्यांच्या कडा ओलावतील, हे चॅलेंज आहे. टीव्ही आणि सोशल मीडियाने खूप चांगले काम केले आहे. वेगवेगळ्या ठिकाणची प्रतीभा जगापुढे आणण्याचे काम ही दोन्ही माध्यमे करत आहेत, असे आनंद महिंद्रा यांनी लिहिले.आनंद महिंद्रा यांचे हे ट्विट‘इंडियन आयडल 11’चा जज विशाल ददलानी यानेही रिट्विट केले आहे. हे ट्विट रिट्विट करताना विशालने लिहिले, ‘आनंद महिंद्रा सर तुम्ही सनीला नोटीस केले, याचा मला आनंद आहे. पुढचा एपिसोड जरूर बघा. इंडियन आयडल 11 चे सर्व स्पर्धक प्रेरणादायी आहेत. तुम्ही आमच्या सेटवर आलात  तर आम्हाला आनंद होईल.’

‘इंडियन आयडल 11’मध्ये येण्यापूर्वी सनी बूटपॉलिश करून मिळणा-या पैशातून उपजीविका चालवत होता. ‘इंडियन आयडल 11’ने त्याच्या नशीबाला कलाटणी दिली. पंजाबच्या बठिंडा येथील अमरपुरा भागात राहणा-या सनीच्या आवाजाने सर्वांना वेड लावले आहे. सोशल मीडियावरही तो लोकप्रिय झाला आहे.

टॅग्स :इंडियन आयडॉल