Join us

जावेद साहब, कितने पैसे मिले? शन्मुखप्रियाचे कौतुक नेटकऱ्यांना खटकले, जावेद अख्तर यांना सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2021 18:22 IST

Indian Idol 12 : जावेद अख्तर यांनी ‘इंडियन आयडल 12’च्या स्पर्धकांचे भरभरून कौतुक केले. पण शन्मुखप्रियाचे त्यांनी केलेले कौतुक कदाचित सोशल मीडिया युजर्सला रूचले नाही.

ठळक मुद्दे‘इंडियन आयडल 12’ची स्पर्धक शन्मुखप्रिया गेल्या अनेक दिवसांपासून ट्रोल होतेय. शन्मुख प्रिया गाण्याच्या नावावर नुसती किंचाळते, असे म्हणत लोक तिला ट्रोल करत आहेत.

‘इंडियन आयडल 12’ (Indian Idol 12) या शोमुळे सध्या गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar) ट्रोल होत आहेत. होय, गेल्या वीकेंडमध्ये या शोमध्ये जावेद अख्तर गेस्ट जज म्हणून पोहोचले. स्पर्धकांनी जावेद अख्तर यांची लोकप्रिय गाणी सादर केली आणि जावेद अख्तर यांनी या प्रत्येक गाण्यामागची कहाणी सांगितली. एकंदर शो चांगलाच रंगला. यादरम्यान जावेद अख्तर यांनी स्पर्धकांचे भरभरून कौतुक केले. पण एका स्पर्धकाचे त्यांनी केलेले कौतुक कदाचित सोशल मीडिया युजर्सला रूचले नाही. नेमक्या याच कारणावरून जावेद अख्तर ट्रोल झालेत.आता या स्पर्धकाचे नाव काय तर शन्मुखप्रिया (Shanmukhapriya).

होय, जावेद अख्तर यांच्या खास फर्माइशवर शन्मुखने ‘मैं हूं झूम झूम झूम झूम झूमरू’ हे गीत गायले. जावेद अख्तर तिच्या आवाजात हे गीत ऐकून जाम खूश झालेत आणि त्यांनी तिचे प्रचंड कौतुक केले. हीच गोष्ट काही युजर्सला खटकली. अनेकांनी शन्मुखप्रियाचे कौतुक केल्याबद्दल जावेद अख्तर यांनाच लक्ष्य केले. एका युजरने तर चक्क, जावेद साहब, कितने पैसे मिले? असा डिवचणारा सवाल केला.

जावेद साहेब, इंडियन आयडलने पैसे देऊन निमंत्रित केले म्हणून तुम्ही काहीही बोलणार का? शन्मुखप्रियाला तिच्या सिंगींगसाठी चार सल्ले देण्याऐवजी तुम्ही तिला चुकीचे मार्गदर्शन केले, हे चूक आहे, असे अन्य एका युजरने लिहिले.

अन्य एका युजरने तर शोच्या मेकर्सवरही राग काढला. ‘जज पळून गेलेत, एक्स-जजेसही भडकले आहे. आता किमान पब्लिकचे तर ऐका. पब्लिकसाठीच शो बनवला आहे ना?,’ असे एका युजरने लिहिले.‘इंडियन आयडल 12’ची स्पर्धक शन्मुखप्रिया गेल्या अनेक दिवसांपासून ट्रोल होतेय. शन्मुख प्रिया गाण्याच्या नावावर नुसती किंचाळते, असे म्हणत लोक तिला ट्रोल करत आहेत. अनेकदा तिला शोमधून बाहेर काढण्याची मागणीही झाली आहे.

टॅग्स :जावेद अख्तरइंडियन आयडॉल