Join us

मोहनाच्या भूमिकेसाठी वाढविले केस - मोनालिसा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2018 15:14 IST

'नजर' ही अमानवी शक्तींवर आधारित मालिका असून त्याचे कथानक मुंबईसारख्या गजबजलेल्या महानगरात घडते.

ठळक मुद्दे'नजर' ही अमानवी शक्तींवर आधारित मालिका

कलाकार एखादी भूमिका वास्तविक वाटण्यासाठी खूप मेहनत घेत असतात. छोट्या पडद्यावरील अभिनेत्री मोनालिसा मेहनती कलाकारांपैकी एक आहे. ‘स्टार प्लस’वरील ‘नजर’ या मालिकेत अभिनेत्री मोनालिसा ही मोहना नावाच्या डायनची भूमिका बजावत असून या डायनच्या केसांची लांब वेणी, उलटी पावले आणि दुसऱ्याला संमोहित करणारी नजर यासारख्या अनेक भीतीदायक वैशिष्ट्ये आहेत. आपली भूमिका वास्तववादी उभी करण्यासाठी मोनालिसाने शक्य ते सर्व प्रयत्न केले आहेत.

मोनालिसा म्हणाली, “या मालिकेत मी मोहनाची भूमिका रंगवीत असून आजवर मी इतकी सुंदर कधीच दिसले नव्हते. ही भूमिका वास्तववादी उभी करण्यासाठी मी माझ्याकडून बरेच प्रयत्न केले. मला खोटी वेणी वापरण्याची गरज भासू नये, म्हणून मी माझे केस वाढविले. मोहना डायन एकच लांबच्या लांब वेणी घालते. त्यामुळे मी तीन महिन्यांपासून माझे केस वाढविण्यास सुरुवात केल्याने मला स्वत:च्या केसांचीच वेणी घालता येते. आता ही भूमिका रंगविताना मला जितकाआनंद झाला, तितकाच प्रेक्षकांना तो मला या भूमिकेत पाहताना होईल, अशी मला आशा वाटते.”'नजर' ही अमानवी शक्तींवर आधारित मालिका असून त्याचे कथानक मुंबईसारख्या गजबजलेल्या महानगरात घडते. या शहरात राहणाऱ्या राठोड परिवाराच्या अनेक पिढ्यांवर एका डायनची वाईट नजर पडलेली असते आणि त्यामुळे त्यांचे जीवन कसे संकटमय होते, त्याची ही कथा आहे. या मालिकेबद्दल मोनालिसाने सांगितले की, 'लहान असल्यापासून मी डायन आणि त्यांच्या वाईट नजरेबद्दल मी इतक्या कथा ऐकल्या आहेत, पण मला तिचीच भूमिका छोट्या पडद्यावर रंगविण्यास मिळेल, असा मी कधीच विचार केला नव्हता. या मालिकेची मन खिळवून ठेवणारी कथा, आधुनिक भारतातील शहरांमध्ये अमानवी शक्तींमुळे घडणारे प्रसंग आणि यातील डायनचे सौंदर्य आणि तिच्या रूपाभोवती असलेल्या वलयामुळे मी या भूमिकेकडे आकर्षिले गेले.''नजर' या मालिकेत मोनालिसा सोबतच स्मिता बन्सल, इशिता धवन, कपिल सोनी यांच्यादेखील मुख्य भूमिका आहेत.

टॅग्स :नजर