Join us
Daily Top 2Weekly Top 5

'तुला शिकवीन चांगलाच धडा' उत्कंठावर्धक वळणावर, प्रेमाच्या परीक्षेत मिळेल अधिपतीला अक्षराची साथ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2024 11:35 IST

Tula Shikavin Changlach Dhada : 'तुला शिकवीन चांगलाच धडा' ही मालिका उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. अक्षराच्या प्रेमात अधिपतीने पाठीला दप्तर आणि अंगावर शाळेचा युनिफॉर्म घालून वर्गात प्रवेश घेतला आहे.

झी मराठी वाहिनीवरील तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेनं अल्पावधीतच रसिकांच्या मनात घर केले आहे. यातील अक्षरा आणि अधिपतीची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावली आहे. दरम्यान आता ही मालिका उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. अक्षराच्या प्रेमात अधिपतीने पाठीला दप्तर आणि अंगावर शाळेचा युनिफॉर्म घालून वर्गात  प्रवेश घेतला आहे. 

तुला शिकवीन चांगलाच धडा ही मालिका प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस पडत आहे आणि आता तर मालिकेत आणखी मज्जा येणार आहे, कारण 'अक्षराच्या प्रेमात अधिपतीने पाठीला दप्तर आणि अंगावर शाळेचा युनिफॉर्म घालून वर्गात  प्रवेश घेतला आहे. अधिपतीला शाळेतल्या कपड्यांमध्ये पाहून अक्षराची बोलतीच बंद होते. अक्षरा वर्ग सोडून जायला निघते पण तितक्यात अधिपती असं काही बोलतो ज्यांनी तिचे पाऊल परत मागे फिरतात. 

भुवनेश्वरीने म्हणजेच आईने घातलेल्या  अटीमुळे अधिपतीकडे काही पर्याय नव्हता पण मास्तरीणबाईंवर असलेल्या प्रेमाखातर त्याला युनिफॉर्म आणि दप्तरची साथ घ्यावी लागली कारण अक्षराची मनधरणी करायची आहे. म्हणतात ना प्रेमाच्या लढाईत सगळंच माफ असतं आणि म्हणूनच अधिपतीने शाळेत जाण्याचा निर्णय घेतलाय. ज्यायोगे अक्षरा त्याला शाळेत तरी टाळू शकणार नाही. आता ह्या प्रेमाच्या परीक्षेत अधिपती पास होईल का? अक्षरा त्याला प्रेमाचे धडे आणि माफी देईल का? भुवनेश्वरीला अधिपतीच्या शाळाप्रवेशाबाबत बातमी कळल्यावर काय होईल? हे सर्व तुम्हाला येणाऱ्या भागात पाहायला मिळेल.