Join us
Daily Top 2Weekly Top 5

"निळ्या निळ्या आकाशात...", सूरज चव्हाणसाठी पत्नीनं घेतला खास उखाणा, व्हिडीओ होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 13:48 IST

Suraj Chavan : 'बिग बॉस मराठी सीझन ५'चा विजेता आणि सोशल मीडिया स्टार सूरज चव्हाण २९ नोव्हेंबर रोजी विवाहबंधनात अडकला. सूरजने पुण्याजवळील सासवडमध्ये मोठ्या थाटामाटात संजना गोफणेशी लग्न केले.

'बिग बॉस मराठी सीझन ५'चा विजेता आणि सोशल मीडिया स्टार सूरज चव्हाण (Suraj Chavan) २९ नोव्हेंबर रोजी विवाहबंधनात अडकला. सूरजने पुण्याजवळील सासवडमध्ये मोठ्या थाटामाटात संजना गोफणेशी लग्न केले. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. लग्नानंतर त्यांची सत्यनारायणची पूजा आणि जागरण गोंधळ पार पडला. त्याचेही व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. दरम्यान सध्या जागरण गोंधळ दरम्यान सूरजची पत्नी संजनाने त्याच्यासाठी घेतलेला खास उखाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.

सोशल मीडियावर सूरजच्या जागरण गोंधळचे व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. यातील एका व्हिडीओत ते दोघे नाचताना दिसत आहेत. तर दुसऱ्या एका व्हिडीओत सूरजची पत्नी त्याच्यासाठी उखाणा घेत आहे. उखाणा घेताना ती म्हणाली की, निळ्या निळ्या आकाशात विमान चालले फास्ट, सूरज रावांचं नाव घेते तुमच्यासाठी खास. तिच्या उखाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे. 

वर्कफ्रंट

सूरज चव्हाण हा लोकप्रिय रिलस्टार आहे. बिग बॉस मराठी ५ मधून त्याला चांगलीच लोकप्रियता मिळाली. यानंतर त्याच्या चाहत्यावर्गात आणखी भर पडली. या पर्वाचा तो विजेतादेखील होता. त्यानंतर सूरजने झापुक झुपूक या सिनेमातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केले. या चित्रपटाला हवा तितका चांगला प्रतिसाद मिळाला नाही. मात्र तरीदेखील सोशल मीडियावर सूरजची क्रेझ अजून कायम आहे.

टॅग्स :बिग बॉस मराठीसेलिब्रेटी वेडिंग