कलर्स मराठीवरील ‘जय जय स्वामी समर्थ’ (Jay Jay Swami Samarth) मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. हा आठवडा खास असणार आहे. या आठवड्यात, मालिकेतील स्वामी समर्थांच्या विलक्षण लीलांचे दर्शन प्रेक्षकांना घडणार आहे. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या पूजेसाठी प्रार्थना करणाऱ्या विधवा गिरीजाला स्वामी तिच्या भक्तीने प्रसन्न होऊन महालक्ष्मी रूपात दर्शन देतील. स्वामींच्या या दिव्य लीलांमधून प्रेक्षकांना शिकवण आणि मार्गदर्शन मिळणार आहे.
याच भागात स्वामींनी दत्तजयंतीसाठी केलेले संकेत देखील प्रेक्षकांना रोमांचित करतील. महाराज येणार असल्याचे जाहीर करत स्वामी आपले आसन रिकामे करून, खऱ्या मानकऱ्याचे स्वागत करण्याची तयारी सुरू करायला सांगतात. हे आगळे दैवी संकेत येत्या दत्तजयंतीच्या निमित्ताने एका नवीन अध्यायाची सुरुवात करतील.
स्वामी सुताच्या गादीचा उत्तराधिकारी कोण? स्वामींनी गादीच्या उत्तराधिकारासाठी नियोजित केलेली अगम्य रचना आणि कपिलामाईला दिलेला इशारा हा कथानकाचा आणखी एक महत्त्वाचा भाग असेल. स्वामी सुतांच्या गादीचा वारस निश्चित करण्याची दैवी लीला पूर्णत्वास जाऊ लागेल. एका गरीब भक्ताचे मंगळसूत्र लुटणाऱ्या कपिलामाईला स्वामी सुताच्या गादीच्या संदर्भात अप्रत्यक्ष संदेश देत दैवी हस्तक्षेपाचे दर्शन घडवतील. येत्या भागांत दाखवले जाणारे प्रसंग, विशेषतः स्वामींच्या महालक्ष्मी रूपाचे दर्शन आणि दत्तजयंतीच्या आगमनाची तयारी, प्रेक्षकांसाठी एक अद्वितीय अनुभव ठरतील. ‘जय जय स्वामी समर्थ’ मध्ये स्वामींच्या या चमत्कारिक कथा दैवी साक्षात्कारांसह आपल्याला अध्यात्माचा सखोल अर्थ शिकवतील.