Join us

'माझी तुझी रेशीमगाठ' उत्कंठावर्धक वळणावर, नेहा आणि अविनाश येणार आमने सामने

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2022 14:31 IST

Mazi Tuzi Reshimgath: सध्या 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिका उत्कंठावर्धक वळणावर आली आहे.

झी मराठी आपल्या लाडक्या प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी नेहमी तत्पर असते आणि त्यांच्या मनोरंजनात कुठेही खंड पडू देत नाही. त्यामुळे येत्या रविवारी देखील प्रेक्षकांना आपल्या लाडक्या मालिकांचे १ तासांचे विशेष भाग पाहायला मिळणार आहे. यात 'माझी तुझी रेशीमगाठ' (Mazi Tuzi Reshimgath) मालिकेचाही एक तासाचा विशेष भाग पाहायला मिळणार आहे. 

सध्या माझी तुझी रेशीमगाठ मालिका उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. नुकतेच मालिकेत नेहासमोर सिम्मी काकूचा खरा चेहरा समोर आला आहे. त्यात मालिकेचा नवीन प्रोमो समोर आला आहे, त्यातून समजते आहे की नेहा आणि अविनाश आमनेसामने येणार आहे.

माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत काही दिवसांपूर्वीच नेहाच्या पहिल्या नवऱ्याची म्हणजेच अविनाशची एन्ट्री झाली आहे. अनेकदा नेहा आणि अविनाश एकमेकांसमोर येता येता राहिले आहेत. मालिकेत येणाऱ्या भागात नेहाचा वाढदिवस साजरा होणार आहे. याच दिवशी नेहाला वाढदिवसाचं मोठे आणि धक्कादायक गिफ्ट मिळणार आहे. कारण परीचा ड्रायव्हर काकाच अविनाश असल्याचं सत्य अखेर नेहासमोर येणार आहे. त्यानंतर अविनाशला पाहून नेहाची प्रतिक्रिया काय असेल? अविनाशच पॅलेस मध्ये येण्यामागचं कारण उघडकीस येणार का? हे जाणून घेण्यासाठी माझी तुझी रेशीमगाठ रविवारी रात्री ८ वाजता पाहावी लागेल. 

टॅग्स :झी मराठी