अंकित लवकरच मालिकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2016 17:44 IST
सपने सुहाने लडकपन के, महारक्षक देवी, संतोषी माँ यांसारख्या मालिकांमध्ये झळकलेला अंकित गेरा लवकरच एका मालिकेत काम करणार असल्याची ...
अंकित लवकरच मालिकेत
सपने सुहाने लडकपन के, महारक्षक देवी, संतोषी माँ यांसारख्या मालिकांमध्ये झळकलेला अंकित गेरा लवकरच एका मालिकेत काम करणार असल्याची चर्चा आहे. स्वरांगी, सिलसिला प्यार का, सौभाग्यलक्ष्मी यांसारख्या मालिकांचे दिग्दर्शन केलेले रवी राज या मालिकेची निर्मिती करणार आहेत. रवी या मालिकेद्वारे निर्मितीक्षेत्रात उतरणार आहेत. अंकित मालिकांप्रमाणे बिग बॉस या कार्यक्रमातही झळकला होता. रवी राज यांच्या मालिकेत अंकित प्रमुख भूमिकेत दिसणार असून या मालिकेत एक नवी अभिनेत्री त्याच्यासोबत झळकणार असल्याची सध्या चर्चा आहे. अभिनेत्रीच्या निवडीसाठी सध्या ऑडिशन्स सुरू आहेत.