Join us

अभिनयापेक्षा कपड्यांना महत्त्व

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2016 13:57 IST

ये है मोहोब्बते या मालिकेत इशिताची भूमिका साकारणाऱ्या दिव्यांका त्रिपाठीने बनू मैं तेरी दुल्हन या मालिकेद्वारे तिच्या कारकिर्दीला सुरुवात ...

ये है मोहोब्बते या मालिकेत इशिताची भूमिका साकारणाऱ्या दिव्यांका त्रिपाठीने बनू मैं तेरी दुल्हन या मालिकेद्वारे तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. या मालिकेत तिची इमेज अतिशय सोज्वळ मुलीची होती. ही इमेज ब्रेक करण्यासाठी तिने काही कॉमेडी भूमिकाही केल्या. पण या इंडस्ट्रीमध्ये कोणत्याही भूमिकेपेक्षा कपड्यांना अधिक महत्त्व दिले जात असे तिचे म्हणणे आहे. दिव्यांका ही भोपाळसारख्या छोट्या शहरातून आल्यामुळे छोटे कपडे घालणे तिला पटत नव्हते. दिव्यांकाच्या मते इंडस्ट्रीमधील लोक यामुळे तिच्या मागे तिची थट्टा करत असत. तिच्या अभिनयाला महत्त्व देण्यापेक्षा तिने कमीतकमी कपडे घालावेत असे त्यांचे म्हणणे असे. पण इशिता ही व्यक्तिरेखा खूप चांगल्या पद्धतीने लिहिली असून केवळ तिच्या अभिनयामुळे लोक तिला आज ओळखत आहेत याचा आनंद होत असल्याचे ती सांगते.