Join us
Daily Top 2Weekly Top 5

'बिग बॉस'मध्ये येतोय इमाम सिद्दिकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2016 16:34 IST

'बिग बॉस' या रिअँलिटी शोमध्ये सध्या प्रिन्स नरुला हा तुल्यबळ प्रतिस्पर्धी मानला जात असला, तरी या शोच्या सहाव्या पर्वाच्या ...

'बिग बॉस' या रिअँलिटी शोमध्ये सध्या प्रिन्स नरुला हा तुल्यबळ प्रतिस्पर्धी मानला जात असला, तरी या शोच्या सहाव्या पर्वाच्या अंतिम फेरीत स्थान मिळवलेल्या इमान सिद्दीकीनं तो दांभिक व खोटा माणूस असल्याची टीका केली आहे. सिद्दीकी या शोमध्ये पाहुणा म्हणून उपस्थित राहणार आहे. ४९ वर्षीय इमाम 'बिग बॉस' शोमध्ये आपल्या उत्स्फूर्तता व विनोदांनी लक्षात राहिला होता. तो आता पुन्हा या शोमध्ये सहभागी असणार्‍यांसाठी नवनवीन आव्हाने घेऊन परतत आहे. इमाम म्हणाला, की या शोमधील प्रिन्स नरुला हे तिरस्करणीय व्यक्तिमत्त्व आहे. तो या शोमध्ये सहभागी असणार्‍यांपैकी सर्वाधिक खोटा माणूस आहे. तो कणाहीन आहे. या शोमध्ये तो भाऊ-बहिणीच्या नात्याचा पुनरुच्चार करत राहिला आणि शेवटी बहीण मानलेल्या किश्‍वर र्मचंटचा त्यानं विश्‍वासघात केला. केवळ या शोच्या खेळासाठी त्यानं हे कृत्य केलं. हा शो म्हणजे 'रोडीज' किंवा 'स्प्लिटव्हिला' नव्हता हे त्याला ठाऊक असायला हवं होतं. त्यानुसार त्यानं वागायला हवं होतं. 'बीग बॉस'मध्ये लोकप्रिय असलेला फॅशन स्टायलिस्ट इमाम या घरात आठवडाभरासाठी राहणार आहे. या शोमध्ये सहभागी झालेल्यांना तो त्यांचा कस लागेल अशी कामगिरी सोपवणार आहे.