Join us
Daily Top 2Weekly Top 5

'आव्हान स्वीकारण्यासाठी मी नेहमीच तयार'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2016 15:53 IST

        बेनझीर जमादारअभिनेत्री एलिना कझान हिने बॉलिवुडमध्ये एजंट विनोद, जॉन डे, आसमा असे अनेक चित्रपटात ...

        बेनझीर जमादारअभिनेत्री एलिना कझान हिने बॉलिवुडमध्ये एजंट विनोद, जॉन डे, आसमा असे अनेक चित्रपटात काम केले आहे. त्याचबरोबर तिने अनेक प्रांतिक चित्रपटदेखील केले आहेत. आता नुकतीच ती बिग बॉसमधून बाहेर पडली आहे. तिच्या या बिग बॉसच्या प्रवासाविषयी आणि काही आगामी प्रोजेक्टविषयी तिने लोकमत सीएनएक्सशी साधलेला हा मनमोकळा संवाद. १.रिअ‍ॅलिटी शोमध्ये येण्यासाठी बिग बॉस या शोची निवड का केली?- बिग बॉस हा शो खूप वर्षापासून चालू आहे. या शो ची प्रसिध्दी तर सगळयांनाच माहिती आहे. प्रेक्षकांना खूपच मनोरंजन करणारा हा रिअ‍ॅलिटी शो आहे. यामध्ये होणारी स्पर्धा ही खरचं आव्हानात्मक असते. तसेच असे आव्हान स्वीकारण्यासाठी मी नेहमीच तयार असते. त्यामुळे या शोमध्ये येण्याची माझी स्वत:ची मनापासून इच्छा होती.२. बिग बॉसच्या प्रवासाविषयी काय सांगशील?- खर सांगू का, बिग बॉसचा माझा प्रवास हा फार कमी कालावधीचा होता. मात्र खूपच इंटरेस्टिंग होता. त्याचबरोबर आणखी थोडा जास्त वेळ मला या घरात राहायला मिळाला पाहिजे होता असे सारखे वाटत आहे. तसेच जास्त वेळ जेलमध्ये असल्यामुळे कित्येक लोकांची ओळख नाही झाली याचे दु:ख वाटते आहे. ३. तुझ्या मते, बिग बॉसचे टॉप तीन स्पर्धक कोण असतील?- मला असे वाटतं की बिग बॉस हा प्रियंका जग्गा, गौरव चोप्रा आणि बानी या तिघांपैकी कोणीतरी होईल. कारण प्रियंका तर जिंकायला तयारच आहे. गौरव खूप विचार करून खेळत आहे. तर बानी ही खूपच स्ट्रॉग खेळाडू असल्याचे प्रत्येकाला माहिती आहे. त्यामुळे या तिघांपैकी कोणीतरी एक बिगबॉस होईल.4. तू मराठी चित्रपटामध्ये काम केले आहे असे ऐकले आहे त्याविषयी काय सांगशील?- दिग्दर्शक आनंद महादेवन दिग्दर्शित डॉ. रखमाबाई हा मराठी चित्रपट मी केला आहे. हा एक ऐतिहासिक चित्रपट आहे. या चित्रपटाचा प्रवास खूपच छान होता. मी मुंबईत असल्यामुळे थोडा फार मराठी टच आहे. खरे सांगू का महाराष्ट्राची लावणीदेखील मला फार आवडते. ६. मराठी चित्रपटांविषयी काय सांगशील?- मराठी चित्रपसृष्ट्रीला खरचं चांगले दिवस आले आहेत. कोर्ट, किल्ला, सैराट हे माझे आवडते चित्रपट आहेत. तसेच माझ्यासाठी कोणताही चित्रपट करण्यासाठी भाषेचा अडसर वाटत नाही. त्यामुळे मराठी, बंगाली, गुजराथी, हिंदी, इटालियन असे सगळेच चित्रपट करण्यास तयार आहे. फक्त स्क्रिप्ट चांगली पाहिजे असा माझा विचार आहे. ७. तुझे आगामी काय प्रोजेक्ट?- सध्या मी एक बॉलिवूड चित्रपट करत आहे. 'वो आदमी बहुत कुछ जानता है.'  असे या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटात माझ्यासोबत गौरव चोप्रा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. आता फक्त गौरव चोप्रा बाहेर येण्याची वाट पाहत आहे. तो आली की, चित्रपटाच्या चित्रिकरणास सुरूवात होणार आहे.