छोट्या पडद्यावरील लोकप्रिय सिंगिग रिएलिटी शो इंडियन आयडॉलच्या १२ व्या सीझनला प्रेक्षकांची खूप पसंती मिळते आहे. या शोचा होस्ट आदित्य नारायण आपल्या गंमती जमती घेऊन परतणार आहे. शोमध्ये संगीतकार अन्नू मलिक आणि गीतकार मनोज मुंतशिर हजेरी लावणार आहेत. दानिशने ‘अय मेरी जोहराजबीं’ आणि ‘चाहुंगा मैं तुझे सांझ सवेरे’ या गाण्यांवर जबरदस्त परफॉर्मन्स दिला. दानिश मोहम्मदने आपल्या गाण्याने सगळ्यांना मंत्रमुग्ध करून सोडले. परीक्षक आणि सगळ्या स्पर्धकांनी त्याला उभे राहून दाद दिली. त्यातर त्या सगळ्यांनी एकत्र इफ्तारीचा आनंद लुटला. दानिश पहिल्यांदाच आपल्या आई-वडिलांपासून दूर इफ्तारी साजरी करत होता.
'इंडियन आयडॉल 12'च्या मंचावर साजरी करण्यात आली इफ्तारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2021 15:34 IST