ओळखा पाहू, फोटोमध्ये दिसत असलेला अभिनेता कोण आहे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2018 19:44 IST
सध्या सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत असून, त्यामध्ये अल्लाउद्दीन खिलजीची भूमिका साकारणाºया रणवीरसारखाच लूक असलेला एक अभिनेता दिसत आहे.
ओळखा पाहू, फोटोमध्ये दिसत असलेला अभिनेता कोण आहे?
दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावत’ या चित्रपटात अल्लाउद्दीन खिलजीची भूमिका साकारणारा अभिनेता रणवीर सिंगचे या भूमिकेसाठी त्यावेळी चांगलेच कौतुक केले गेले. या भूमिकेत रणवीरने एक वेगळीच छाप सोडली होती. मात्र शनिवारी सोशल मीडियावर अचानकच ‘पद्मावत’मधील या अल्लाउद्दीनचा लूक असलेला एक फोटो धडकला. हा फोटो बघून अनेकांना तो रणवीर सिंगच वाटला. कारण त्यामध्ये दिसणारा अल्लाउद्दीन अन् रणवीरने साकारलेला अल्लाउद्दीन हुबेहुब दिसत होते. आता तुम्हाला प्रश्न पडला असे की, मग तो फोटोमध्ये दिसत असलेला अल्लाउद्दीन कोण? तर तो रणवीर सिंग नसून, टीव्ही अभिनेता रवि दुबे आहे. ‘जमाई राजा’ फेम रवि दुबे सध्या टीव्हीवर होस्टिंग करताना बघावयास मिळत आहे. आता रवि पुन्हा एकदा नव्या शोसह टीव्हीवर येत आहे. याच शोचा एक नवा प्रोमो रिलीज करण्यात आला असून, त्यामध्ये रवि अल्लाउद्दीन खिलजीच्या अवतारात बघावयास मिळत आहे. रविने रणवीरने साकारलेला अल्लाउद्दीन असा काही हुबेहूब साकारला की, त्याला ओळखणे अवघड होत आहे. अनेकांना तर तो रणवीर सिंगच असल्याचे वाटत आहे. स्टार प्लस वाहिनीवर ‘सबसे स्मार्ट कोन?’ हा नवा शो येत आहे. रवि या शोला होस्ट करताना बघावयास मिळणार आहे. या शोचा एक नवा प्रोमो रिलीज करण्यात आला असून, त्यात तो अत्यंत फनी अंदाजात दिसत आहे. सध्या त्याच्या या शोचा प्रोमो चांगलाच पसंत केला जात आहे.