Join us
Daily Top 2Weekly Top 5

अरुण गोविल यांना असलेल्या या वाईट सवयीमुळे रामायणातील भूमिकेसाठी करण्यात आले होते रिजेक्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2020 17:30 IST

सुरुवातीला या मालिकेत काम करण्यासाठी अरुण गोविल यांना रिजेक्ट करण्यात आले होते. त्यांना ही भूमिका न देण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेण्यामागे एक खास कारण होते.

ठळक मुद्देरामायण या मालिकेचे सर्वेसर्वा रामानंद सागर यांचे म्हणणे होते की, या मालिकेत रामाच्या भूमिकेत असलेल्या कलाकाराला कोणतीच वाईट सवय असता काम नये. पण त्यावेळी अरुण गोविल स्मोकिंग करत असत.

अरुण गोविल यांचा आज वाढदिवस असून त्यांनी अनेक चित्रपट, मालिकांमध्ये काम केले आहे. पहेली या चित्रपटाद्वारे त्यांनी त्यांच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. सावन आने दो, जुदाई, हिम्मतवाला, कानून, हतकडी यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी खूप चांगल्या भूमिका साकारल्या. तसेच त्यांनी विक्रम बेताल या मालिकेत देखील काम केले. पण त्यांना खऱ्या अर्थाने लोकप्रियता रामायण या मालिकेमुळे मिळाली. या मालिकेतील त्यांनी साकारलेली रामाची भूमिका चांगलीच गाजली. पण तुम्हाला माहीत आहे का, सुरुवातीला या मालिकेत काम करण्यासाठी त्यांना रिजेक्ट करण्यात आले होते. त्यांना ही भूमिका न देण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेण्यामागे एक खास कारण होते.

रामायण या मालिकेचे सर्वेसर्वा रामानंद सागर यांचे म्हणणे होते की, या मालिकेत रामाच्या भूमिकेत असलेल्या कलाकाराला कोणतीच वाईट सवय असता काम नये. पण त्यावेळी अरुण गोविल स्मोकिंग करत असत. त्यामुळे या भूमिकेसाठी ते योग्य नाहीत असे रामानंद सागर यांचे म्हणणे होते. पण अरुण यांनी स्मोकिंग करणे सोडल्यामुळेच त्यांना या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. रामायण या मालिकेत काम करण्याची संधी मिळाल्यानंतर अरुण गोविल यांनी कायमचेच स्मोकिंग करण्याचे सोडून दिले. त्यांनीच ही गोष्ट आजतकला दिलेल्या मुलाखतीत सांगितली होती.

रामानंद सागर यांच्या रामायण या मालिकेला नव्वदाच्या दशकात लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. ही मालिका सुरू असताना रस्त्यावर एकही माणूस दिसायचा नाही अशी त्या काळी परिस्थिती होती. रामायण या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या होत्या. या मालिकेत रामाची भूमिका अरुण गोविल यांनी तर सीतेची भूमिका दीपिका चिखलियाने साकारली होती. त्या दोघांनीही आपल्या भूमिका इतक्या चांगल्या प्रकारे साकारल्या होत्या की, प्रेक्षक त्यांनाच राम आणि सीता समजून त्यांच्या पाया पडण्यासाठी जात असत. या मालिकेने या दोघांनाही प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण अरुण आणि दीपिका यांच्या दर्शनासाठी लोक रांगा लावत असत. तसेच त्यांच्या दर्शनासाठी येताना देवळात ज्याप्रकारे आपण हार, अगरबत्ती, नारळ घेऊन जातो, त्याप्रमाणे लोक घेऊन येत असत.

टॅग्स :रामायण