Join us

"माझ्यात ना रंग, ना रूप, ना पैसा...", कुशलची ही गोष्ट पाहून पत्नीने लग्नाला दिलेली पसंती, त्यानेच केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2025 11:37 IST

Kushal Badrike : कुशल बद्रिकेने सोशल मीडियावर पत्नीसोबतचा व्हिडीओ शेअर करत मजेशीर पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने त्याची पत्नीने त्याच्यात काय पाहून लग्न केलंय, याचा खुलासा केला आहे.

कुशल बद्रिके (Kushal Badrike) मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याला झी मराठी वाहिनीवरील 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) या शोमधून चांगलीच लोकप्रियता मिळाली. या शोमध्ये त्याने त्याच्या विनोदाच्या जोरावर रसिकांना खळखळून हसायला भाग पाडले. खऱ्या आयुष्यातही कुशल मजेशीर आहे. त्याचा प्रत्यय त्याच्या सोशल मीडियावरील पोस्टवरुन येतो. अनेकदा तो पत्नी सुनयनासोबतचे मजेशीर व्हिडीओ शेअर करत असतो. आता त्याने सोशल मीडियावर पत्नीसोबतचा व्हिडीओ शेअर करत मजेशीर पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने त्याची पत्नीने त्याच्यात काय पाहून लग्न केलंय, याचा खुलासा केला आहे.

कुशल बद्रिकेने सोशल मीडियावर पत्नीसोबतचा कोणत्यातरी शोच्या सेटवरील व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ते दोघे एकमेकांचे हात पकडून चालताना दिसत आहेत. त्याने हा व्हिडीओ शेअर करून लिहिले की, एकदा मी बायकोला विचारलं की तुला, “माझ्यातली” नेमकी कुठली गोष्ट आवडली ? म्हणजे माझ्यात ना रंग, ना रूप, ना पैसा, ना नोकरी का म्हणून पसंत केलं असशील मला ? तर मला म्हणाली… “मलाना तुझे डोळे फार आवडतात, मनातलं काही लपवता येत नाही त्यांना”. आता ते खरं का खोटं माहीत नाही… पण एखाद्या दगडात सुद्धा देव शोधणारी माणसं असतात जगात. हे मात्र खरं. :-सुकून.

कुशलच्या या पोस्टवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे. चाहत्यांसोबत कलाकार मंडळींनीही कमेंट केली आहे. हेमांगीने लिहिले की, अरे सुनयना काय दिसतेय.. म्हणजे लास्ट टाइम त्या पिंक साडीत ही आणि आता यात ही. कमाल. मला तिची स्टायलिंग आवडते. सुपर्ब सांग तिला. तिच्या या कमेंटवर रिप्लाय देत सुनयनाने आभार मानले. श्रेया बुगडेने प्रेम प्रेम म्हणत हार्ट इमोजी शेअर केला आहे. खुशबू तावडे आणि मेघना एरंडेनेही हार्ट इमोजी शेअर केली आहे. तर एका युजरने म्हटले की, कदाचित तिला तुझी कलाही आवडली असेल. दुसऱ्या युजरने लिहिले की, तिने तुला बरोबर शोधले. आणखी एकाने लिहिले की, तुमच्या दोघांतलं प्रेम बघणं छान वाटतं. 

टॅग्स :कुशल बद्रिकेचला हवा येऊ द्या