Join us
Daily Top 2Weekly Top 5

पती माझे सौभाग्यवती घेणार प्रेक्षकांचा निरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2016 15:52 IST

वैभव मांगलेची पती माझे सौभाग्यवती ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. वैभवसारखा चांगला कलाकार प्रमुख भूमिकेत असूनही या ...

वैभव मांगलेची पती माझे सौभाग्यवती ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. वैभवसारखा चांगला कलाकार प्रमुख भूमिकेत असूनही या मालिकेला प्रेक्षकांचे मन जिंकला आले नाही. सुरुवातीपासूनच ही मालिका टिआरपीच्या रेसमध्ये टिकू शकली नाही. या मालिकेत वैभव मांगले लक्ष्मी आणि वैभव अशा दोन भूमिका साकारत आहे. प्रेक्षकांनी वैभवला स्त्री भूमिकेत स्वीकारले नसल्याने बहुधा या मालिकेला तितकासा प्रतिसाद मिळाला नाही. ही मालिका पुढील महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात संपणार आहे.