Join us

विनोदी लेखक तारक मेहता यांचे अहमदाबादमध्ये निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2017 12:08 IST

लोकप्रिय कॉमेडी मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेचे लेखक तारक मेहता यांनी त्यांच्या लेखनाने रसिकांचे तुफान मनोरंजन ...

लोकप्रिय कॉमेडी मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेचे लेखक तारक मेहता यांनी त्यांच्या लेखनाने रसिकांचे तुफान मनोरंजन केले. मात्र रसिकांच्या चेह-यावर हसू खुलवणारे तारक मेहता यांचे निधन झाले आहे. गेल्या काही वर्षापासून ते आजारी होते. ते 87 वर्षाचे होते. 2015 साली त्यांना पद्मश्री  पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते.त्यांच्या विनोदी लिखाणामुळे तारक मेहता हा शो घराघरात पोहचला. रसिकांच्या प्रेमामुळेच 'लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस'मध्येही तारक मेहता का उल्टा चष्मा या शोने आपले स्थान मिळवले होते.तारक मेहता यांनी आपल्या लेखणीने गुजराती नाटकाचा मंच गाजवला.काही कॉमेडी नाटकंही त्यानी लिहीली होती.1971 साली त्यांनी एका वृत्तपत्रासाठी स्तंभलेखनही केले होते.जवळपास 80 हून अधिक त्यांनी लिहीलेली पुस्तकं प्रकाशित झाली आहेत.