Join us
Daily Top 2Weekly Top 5

साखरपुड्याला एक महिना होताच ह्रता दुर्गुळेने शेअर केला होणाऱ्या पतीसोबतचा रोमाँटिक video, म्हणाली-तू...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2022 18:09 IST

अभिनेत्री हृता दुर्गुळे (Hruta Durgule)ने शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री हृता दुर्गुळे (Hruta Durgule) हिचा प्रतीक शाह (Prateek Shah) सोबत 24 डिसेंबरला साखरपुडा पार पडला आहे. ह्रताच्या आणि प्रतीकच्या साखरपुड्याला नुकताच एक महिना पूर्ण झाला आहे. यानिमित्त ह्रताने एक रोमाँटिक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओत ह्रताने फोटोंचा क्लोज आहे. तू ऐसा कैसा है असं गाणं तिने या व्हिडीओच्या बॅग ग्राऊंडला लावलं आहे. सेलिब्रेटींसह चाहत्यांनी या व्हिडीओ लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

हृताचा होणार नवरा प्रतीक शाह असून तो लोकप्रिय टीव्ही दिग्दर्शक आहे. प्रतिकने आतापर्यंत अनेक गाजलेल्या मालिकांचे दिग्दर्शन केले आहे. बेहद २', 'बहू बेगम', 'कुछ रंग प्यार के ऐसे भी', 'तेरी मेरी एक जिंदड़ी' या मालिकांसाठी त्याने काम केले आहे.

हृता दुर्गुळे हिने छोट्या पडद्यावर दुर्वा या मालिकेतून पदार्पण केले. त्यानंतर तिला खरी लोकप्रियता मिळाली ती फुलपाखरू या मालिकेतून. ऋताचे दादा एक गुड न्यूज आहे हे नाटक लोकप्रिय झाले आहे. सध्या ती मन ऊडू ऊडू झाले या मालिकेत काम करते आहे. तर प्रतिक शाह हा टेलिव्हिजनवरील आघाडीचा दिग्दर्शक आहे. त्याने आतापर्यंत बेहद २, कुठ रंग प्या के ऐसे भी, तेरी मेरी एक जिंदडी, बहू बेगम या मालिकांचे दिग्दर्शन केले आहे. प्रतिकची आई मुग्धा शाह यादेखील लोकप्रिय अभिनेत्री आहेत.

टॅग्स :ऋता दूर्गुळेटिव्ही कलाकार