Join us
Daily Top 2Weekly Top 5

हृता दुर्गुळे आणि प्रतिक शाहचा पार पडला साखरपुडा, फोटो आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2021 11:22 IST

टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री हृता दुर्गुळे (Hruta Durgule) हिचा नुकताच प्रतिक शाह (Pratik Shah) सोबत साखरपुडा पार पडला.

टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री हृता दुर्गुळे (Hruta Durgule) हिचा नुकताच प्रतिक शाह (Pratik Shah) सोबत साखरपुडा पार पडला आहे. यावेळी हृताने केशरी गुलाबी अशी साडी नेसली होती. या गेटअपमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. तर प्रतिक शाहने ऑफ व्हाईट रंगाची शेरवानी घातली होती. हृता आणि प्रतिकची जोडी खूपच सुंदर दिसत होती. अंगठी घालताना हृताने वेडिंग गाऊन परिधान केला होता तर प्रतिकने सूट घातला होता.  हृता आणि प्रतिक यांच्या साखरपुड्याचे काही व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

हृता दुर्गुळे आणि प्रतिक शाह यांनी एंगेजमेंट रिंगसोबतचा फोटो शेअर करत लिहिले की, नवीन सुरूवातीची जादू. त्यांच्या या पोस्टवर चाहते आणि सेलिब्रेटी शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे. 

हृता दुर्गुळे हिने छोट्या पडद्यावर दुर्वा या मालिकेतून पदार्पण केले. त्यानंतर तिला खरी लोकप्रियता मिळाली ती फुलपाखरू या मालिकेतून. ऋताचे दादा एक गुड न्यूज आहे हे नाटक लोकप्रिय झाले आहे. सध्या ती मन ऊडू ऊडू झाले या मालिकेत काम करते आहे. तर प्रतिक शाह हा टेलिव्हिजनवरील आघाडीचा दिग्दर्शक आहे. त्याने आतापर्यंत बेहद २, कुठ रंग प्या के ऐसे भी, तेरी मेरी एक जिंदडी, बहू बेगम या मालिकांचे दिग्दर्शन केले आहे. प्रतिकची आई मुग्धा शाह यादेखील लोकप्रिय अभिनेत्री आहेत.

टॅग्स :ऋता दूर्गुळे