Join us

बाबो!! जेठालालचा नुसता एक फोटो शेअर केला अन् त्याचे 200 फॉलोअर्स वाढले, वाचून थक्क व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2021 15:17 IST

Taarak Mehta Ka Ooltah Chashma : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ हा भारतीय टेलिव्हिजनचा सर्वात लोकप्रिय शो आहे आणि ही लोकप्रियता केवळ भारतापुरतीच मर्यादीत नाही तर विदेशातही हा शो प्रसिद्ध आहे. विश्वास बसत नसेल तर एका स्पॅनिश पत्रकाराची ही पोस्ट तुम्ही वाचायलाच हवी

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashma) हा भारतीय टेलिव्हिजनचा सर्वात लोकप्रिय शो आहे आणि ही लोकप्रियता केवळ भारतापुरतीच मर्यादीत नाही तर विदेशातही हा शो प्रसिद्ध आहे. विश्वास बसत नसेल तर एका स्पॅनिश पत्रकाराची ही पोस्ट तुम्ही वाचायलाच हवी. होय, केवळ जेठालालचा ( Jethalal Gada) एक फोटो शेअर केला आणि या पत्रकाराला 200 नवे फॉलोअर्स मिळाले. त्याची लोकप्रियता वाढली.होय, स्पॅनिश पत्रकार David Llada ने ट्वीट करत ही माहिती दिली आहे. ‘जेठालालचा फक्त एकदा उल्लेख केला आणि अचानक माझे 200 फॉलोअर्स वाढलेत,’ असे ट्वीट डेव्हिडने केले आहे.

आता या पत्रकाराचा आणि जेठालालचा काय संबंध असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर 21 नोव्हेंबरला आर्मेनियाचा बुद्धिबळपटू Levon Aronianने जेठालालचा एक प्रिंटेड शर्टमधील फोटो आपल्या फोटोसोबत शेअर केला होता.

लेव्हॉन अरोनियनने जेठालालच्या शर्टाची कॉपी करत अगदी तसाच शर्ट घातला होता. ‘मी जेव्हा खेळतो, तेव्हा माझी गर्लफ्रेन्ड काय करते, असा प्रश्न मला लोक विचारतात. ती काय करते तर माझ्या फोटोचे असे मीम बनवते,’ असे कॅप्शन त्याने या फोटोला दिले होते. लेव्हॉन अरोनियन  ही पोस्ट स्पॅनिश पत्रकार व चेस प्रमोटर David Lladaने त्याच्या ट्वीटर हँडलवर शेअर करत, कमेंट केली होती. जेठालालचा शर्ट तुझ्यापेक्षा चांगला आहे, अशी कमेंट त्याने केली होती.त्याच्या या पोस्टनंतर डेव्हिडचे अचानक फॉलोअर्स वाढले आणि त्यालाही धक्काच बसला. जेठालाल आणि तारक मेहतामधील अन्य व्यक्तिरेखा किती लोकप्रिय आहेत, याचा अंदाज यावरून तुम्हाला आलाच असेल.

टॅग्स :तारक मेहता का उल्‍टा चश्‍मा