‘ये कैसी यारीयाँ’चं रियुनियन !
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2016 11:53 IST
'कैसी ये यारीयाँ' या मालिकेतील कलाकारांचं नुकतंच रियुनियन पाहायला मिळालं. या मालिकेत माणिक ही भूमिका साकारणा-या अभिनेता पार्थनं सगळ्या ...
‘ये कैसी यारीयाँ’चं रियुनियन !
'कैसी ये यारीयाँ' या मालिकेतील कलाकारांचं नुकतंच रियुनियन पाहायला मिळालं. या मालिकेत माणिक ही भूमिका साकारणा-या अभिनेता पार्थनं सगळ्या कलाकारांसोबतचा फोटो नुकताच सोशल नेटवर्किंग साईटवर शेअर केला. चार्ली चौहान, करण जोटवानी आणि अभिलाष कुमार हे सारेच या रियुनियनचा आनंद घेत असल्याचं या फोटोत पाहायला मिळतंय. मात्र मालिकेत नंदिनीची भूमिका साकारणारी निती टेलर या फोटोत पाहायला मिळत नाही. याशिवाय अयाज अहमद, कृष्णन बरेटो आणि उत्कर्ष गुप्ता यांचीही या रियुनियनमध्ये कमी जाणवतेय. विशेष म्हणजे ही मालिका सुरु असताना निती आणि पार्थ यांच्यात वाद झाला होता. त्यामुळंच तर कदाचित या रियुनियनचं निमंत्रण नितीला देण्यात आलं नाही.