‘सा रे गा मा पा’तील दोन स्पर्धक बहिणींना मिका देणार घर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2016 17:28 IST
‘सा रे गा मा पा’ या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झालेल्या दोन स्पर्धक बहिणींना गायक मिका सिंह एक घर भेट ...
‘सा रे गा मा पा’तील दोन स्पर्धक बहिणींना मिका देणार घर
‘सा रे गा मा पा’ या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झालेल्या दोन स्पर्धक बहिणींना गायक मिका सिंह एक घर भेट देणार आहे. हशमत व सुल्ताना असे या बहिणींचे नाव आहे. त्या पंजाबच्या होशियारपूरच्या राहणाºया आहेत. हशमत व सुल्ताना या दोघींमधील प्रतीभा पाहून ‘सा रे गा मा पा’मध्ये ‘उस्ताद’च्या भूमिकेत असलेला मिका चांगलाच प्रभावित झाला आहे.हशमत व सुल्ताना दोघीही अत्यंत गरिब कुटुंबातील आहे. पैसाच्या तंगीमुळे दोघींनीही संगीताचे कुठलेही औपचारिक शिक्षण घेतलेले नाही. पण या दोघीही आॅडिशनसाठी दिल्लीला आल्या. या दोघीही सहा लोकांच्या कुटुंबासह एका खोलीत राहतात. त्यामुळेच मिका या दोघींना एक नवे घर बनवून देणार आहे. मिका यासंदर्भात म्हणाला, होय, मी हशमत व सुल्ताना या दोघींना एक घर बनवून देण्याचे वचन दिले आहे. त्यांच्यासारख्या प्रतिभावान गायिकांनी इतक्या गरिबीत जगावे, हे खरचं दुर्दैवी आहे. यापूर्वी मिकाने याच शोमधील अन्य एक स्पर्धक दीपक याला आपली महागडी घड्याळ भेट म्हणून दिली होते. शिवाय तो सुपर १२ मध्ये आल्यास त्याला बाईक घेऊन देण्याचे वचनही दिले होते.