Join us
Daily Top 2Weekly Top 5

​रांगड्या मातीतील प्रेमकथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2016 18:10 IST

कोल्हापूरच्या रांगडी मातीतील प्रेमकथा प्रेक्षकांना तुझ्यात जीव रंगला या मालिकेत पाहायला मिळणार आहे. दोन विभिन्न स्वभावाच्या दोघांची ही कथा ...

कोल्हापूरच्या रांगडी मातीतील प्रेमकथा प्रेक्षकांना तुझ्यात जीव रंगला या मालिकेत पाहायला मिळणार आहे. दोन विभिन्न स्वभावाच्या दोघांची ही कथा असून या मालिकेद्वारे हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर हे दोन नवे चेहरे प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. राणा आणि अंजली यांची ही कथा असून राणा हा एक पहिलवान आहे. अतिशय श्रीमंत घराण्यातला असूनही त्याला आपल्या श्रीमंतीचा गर्व नाहीये. पहिलवान हा ब्रम्हचार्य असला पाहिजे असे त्याच्या मनात लहानपणापासूनच बिंबवण्यात आले आहे. पण त्याच्या गावात नव्याने आलेल्या अंजलीच्या तो प्रेमात पडतो आणि नकळत तिच्याकडे आकर्षित होतो. राणा हा अतिशय कमी शिकलेला आहे तर अंजली ही उच्चशिक्षित आहे. आपल्या वडिलांची बदली झाल्यामुळेच ती त्या गावात आली आहे आणि तिथे शिक्षिकेचे काम करायला लागते. हळूवार फुलणारी त्यांची ही प्रेमकथा प्रेक्षकांना आवडेल अशी मालिकेच्या टीमला आशा आहे.