Join us
Daily Top 2Weekly Top 5

बने फॅमिलीमधील लहान सदस्यांच्या भेटीला येणार हनी-बनी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2019 20:12 IST

हनी आणि बनीसोबत धमाल-मस्ती करण्याचे वेड बने कुटुंबामधील लहान सदस्यांनी लागले आहे.

परीक्षा म्हटलं की चेहऱ्यावरचे हावभावच बदलतात. परीक्षेमुळे लहान मुलांच्या खेळण्याची वेळ कमी होते, त्यांना थोडावेळ मजा-मस्ती करु का, असे विचारावे लागते आणि सतत अभ्यास करा असे देखील ऐकावे लागते. अशीच काहीशी गत झाली आहे ‘ह.म.बने तु.म.बने’ मालिकेतील ज्युनिअर्स बनेंची. 

आता सध्या सगळीकडे परीक्षेचे वारे वाहत आहेत आणि या कुटुंबातील लहान मुले देखील परीक्षेच्या अभ्यासात गुंग झाली आहेत. जरी ते गुंग झाले असले तरी त्यांचे संपूर्ण लक्ष हे ‘सोनी ये’च्या हनी आणि बनी या धमाल जोडीकडे आहे. ‘सोनी ये’ या लहान मुलांच्या वाहिनीवरील हनी आणि बनी हे दोन कार्टून फारच लोकप्रिय होत आहेत. ‘सब झोलमाल है’ या ऍनिमेटेड कॉमेडी टेलिव्हिजन कार्यक्रमातील अनेक पात्रांपैकी दोन पात्रे म्हणजे जुळ्या मांजरी हनी आणि बनी. या दोघांची एकत्र टीम बनवून इतरांसोबत प्रँक करण्याचा किंवा इतरांची मजा घेण्यात यांना आनंद मिळतो. या हनी आणि बनीसोबत धमाल-मस्ती करण्याचे वेड बने कुटुंबामधील लहान सदस्यांनी ही लागले आहेत.

पण परीक्षा असल्यामुळे पहिले अभ्यास आणि मग खेळ असे सांगून परीक्षा संपल्यावर त्यांच्या भेटीला येणार आहेत हनी आणि बनी. त्यांची पहिली भेट कशी असेल, ते काय-काय धमाल करतील हे जाणून घेण्यासाठी नक्की पाहा ‘ह.म.बने तु.म.बने’ सोमवार ते शनिवार रात्री १० वाजता फक्त सोनी मराठीवर. 

टॅग्स :सोनी मराठी