Join us
Daily Top 2Weekly Top 5

होणार सून मी ह्या घरची पुन्हा एकदा येणार प्रेक्षकांच्या भेटीस, या वेळात पाहाता येणार मालिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2020 18:15 IST

तेजश्री प्रधान आणि शशांक केतकर यांची मुख्य भूमिका असलेली होणार सून मी ह्या घरची मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

ठळक मुद्देही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येत असून झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांना ही मालिका दररोज दुपारी १२ ते ३ या वेळात पाहायला मिळणार आहे.

सध्या भारतात लॉकडाऊन असल्याने कोणत्याच मालिकेचे अथवा चित्रपटाचे चित्रीकरण होत नाहीये. त्यामुळे छोट्या पडद्यावर गाजलेल्या जुन्या मालिका पुन्हा प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. झी मराठी वाहिनीवरील अनेक जुन्या मालिका पुन्हा प्रक्षेपित केल्या जात असून प्रेक्षक या मालिका अतिशय आनंदाने पाहात आहेत.

सध्या प्रेक्षकांना स्वराज्यरक्षक संभाजी, जय मल्हार या त्यांच्या आवडत्या मालिका पुन्हा एकदा झी मराठीवर पाहायला मिळत आहेत. त्याचसोबत आता प्रेक्षकांची आणखी एक आवडती मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. होणार सून मी ह्या घरची या मालिकेने काही वर्षांपूर्वी टीआरपीचे अनेक रेकॉर्ड मोडले होते. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना भावल्या होत्या. एवढेच नव्हे तर या मालिकेचे टायटल साँग देखील प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. आता ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येत असून झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांना ही मालिका दररोज दुपारी १२ ते ३ या वेळात पाहायला मिळणार आहे.

'होणार सून मी ह्या घरची' मालिकेत शशांक केतकरने साकारलेली श्रीची भूमिका खूप गाजली होती. श्री आणि जान्हवी यांच्या जोडीला रसिकांनी भरघोस पसंती दिली होती. या मालिकेत जान्हवीच्या भूमिकेत तेजश्री प्रधानला प्रेक्षकांना पाहायला मिळाले होते. या मालिकेमुळे शशांक आणि तेजश्रीला प्रचंड लोकप्रियता मिळाली. 

होणार सून मी ह्या घरची ही मालिका प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली होती. या मालिकेतील सगळ्या व्यक्तिरेखा प्रचंड प्रसिद्ध झाल्या होत्या. या मालिकेतील जान्हवी, श्री या मुख्य व्यक्तिरेखांसोबतच पिंट्या, ताई मावशी या सगळ्याच व्यक्तिरेखा लोकप्रिय झाल्या होत्या. 

टॅग्स :तेजश्री प्रधान शशांक केतकर